ETV Bharat / city

मुलाच्या अकाली निधनाने बसला धक्का; आई-वडिलांनीही सोडले प्राण - औरंगाबाद डॉक्टर आई-वडील मृत्यू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय माणिकराव नवले यांचे १५ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्यावर त्याच दिवशी ऊस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना मुलाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला.

मुलाच्या अकाली निधनाने बसला धक्का; आई-वडिलांनीही सोडले प्राण

author img

By

Published : Apr 24, 2021, 4:38 PM IST

Updated : Apr 25, 2021, 10:37 AM IST

औरंगाबाद - मुलाच्या अकाली मृत्यूचा धक्का बसल्याने आई-वडिलांनीही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत दिवंगत प्राध्यापक संजय नवले यांचे वडील माणिकराव (माजी शिक्षण अधिकारी, ८०) व आई मंदाकिनी (७८) हे मृत्यू पावले आहेत. दोघांचा मृत्यू शुक्रवारी सायंकाळी पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला. त्यांच्यावर शनिवारी सकाळी धनकवडी, पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

१५ मार्च रोजी झाले होते डॉ. संजय नवले यांचे निधन -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ. संजय माणिकराव नवले यांचे १५ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्यावर त्याच दिवशी ऊस्मानाबादेत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारास उपस्थित असलेल्या वयोवृद्ध आई-वडिलांना मुलाच्या मृत्यूने मोठा धक्का बसला. अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना पुण्यातील बोरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच माणिकराव नवले यांचे शुक्रवारी सायकांळी ५ वाजता निधन झाले. तर दोन तासातच पत्नी मंदाकिनी माणिकराव नवले यांनीही प्राण सोडला. पुत्रवियोगाचा धक्का बसल्याने अंथरुणाला खिळलेल्या या दोघांचीही प्राणज्योत मालवली. या दाम्पत्यावर शनिवारी सकाळी धनकवडी, पुणे येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुलगुरू डॉ. प्रमोद नवले यांनी वाहिली श्रद्धांजली -

डॉ. संजय नवले यांच्या पाठोपाठ आई- वडिलांचेही निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आम्ही सर्वजण या दुःखात सहभागी आहोत, असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी नवले कुटुंबीयास पाठविलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Last Updated : Apr 25, 2021, 10:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.