ETV Bharat / city

Omicron In Aurangabad : औरंगाबादेत आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण, प्रशासनाने केला हाय अलर्ट जारी

author img

By

Published : Dec 21, 2021, 11:36 AM IST

औरंगाबादमधील नागरिकांची चिंता वाढली ( Omicron In Aurangabad ) आहे. इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या औरंगाबादच्या एका तरुणीला ओमायक्रॉनची लागण ( Young Woman Omicron Infected ) झाली आहे. तिला भेटण्यासाठी तिचे वडील मुंबईत रुग्णालयात गेले असता त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादेत आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण
औरंगाबादेत आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण

औरंगाबाद - इंग्लंडमध्ये स्थायिक असलेली औरंगाबादची तरुणी ओमायक्रॉन बाधित ( Young Woman Omicron Infected ) असल्याचं समोर आलं. तिच्यात मुंबईत उपचार सुरू असताना, तिला भेटायला गेलेल्या तिच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न ( Omicron In Aurangabad ) झाले. त्यांचे स्वबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात हाय अलर्ट जारी करण्यात ( High Alert In Aurangabad ) आलाय.

वडील बाधित तर आई - बहीण सुरक्षित
ओमायक्रॉन बाधित असलेली ही युवती इंग्लंडहून प्रवास करून मुंबईत ( England To Mumbai Travel ) दाखल झाली होती. पुण्याला कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी 21 वर्ष ही तरुणी कुटुंबियांसह आली होती. मात्र विमानतळावर तिची तपासणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र तिचे वडील आई आणि बहीण हे निगेटिव्ह असल्याने त्यांना सोडण्यात आले. औरंगाबादला आल्यावर आई आणि बहीण एका हॉटेलमध्ये अलगीकरण कक्षात राहत होत्या. तर वडील मुंबईलाच मुलीचा उपचारासाठी थांबले होते. दरम्यान वडील दोन दिवसांपूर्वी बायको आणि मुलीची चौकशी करण्यासाठी औरंगाबाद शहरात दाखल झाल्यावर त्यांची देखील आरोग्य तपासणी केली असता, ते कोरोना बाधित असल्याचं समोर आलं. त्यांना तातडीने मेल्ट्रोन कोविड सेंटर ( Meltron Covid Center ) येथे अलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

शहरातील एका हॉटेलमधील वीस जणांची चाचणी
तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीय देखील पुण्याला कौटुंबिक सोहळ्यात सामील झाले नाही. ज्या हॉटेलमध्ये कुटुंबीय राहिले तिथे ते कोणाच्या संपर्कात देखील आले नाही. मात्र युवतीचे वडील येऊन गेलेल्या, त्या हॉटेलमधील वीस जणांची चाचणी करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. तर वडिलांच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल असं पालिकेच्या वतीने सांगण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.