ETV Bharat / city

सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेचा गळफास - Newlyweds women suicide news

याप्रकरणी अश्विनी यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

aurangabad
aurangabad
author img

By

Published : Jan 5, 2021, 3:06 PM IST

औरंगाबाद - चेतना नगर येथील रहिवासी अश्विनी धम्मपाल वानखेडे (वय २४) या नवविवाहित महिलेने शनिवारी दुपारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काल रात्री तिचा मृत्यू झाला.

मद्यपान करून त्रास

दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांचा ९ फेब्रुवारी 2020 रोजी महानगर पालिकेच्या साफसफाई कर्मचारी धम्मपाल वानखेडेशी विवाह झाला होता. काही दिवसातच अश्विनी यांना सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरुवात केली. पती धम्मपाल जाधव हादेखील रोज मद्यपान करून त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी राहत्या घरातील लोखंडी रॉडला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अश्विनी यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.