औरंगाबाद - जिल्ह्यात 120 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या शंभरी पार गेल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख 50 हजार 159 झाली आहे. तर बुधवारी 20 जणांना (मनपा 20) डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजपर्यंत एक लाख 46 हजार 229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. तसेच एकूण 272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
आज नव्याने आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे -
मनपा (103), क्रांती चौक 1, विजय नगर 1, उल्का नगरी 1, बीड बायपास 7, एन-चार येथे 3, घाटी परिसर 1, गुलमंडी 1, गजानन महाराज मंदिर 1, एन-बारा येथे 1, बाबर कॉलनी 1, देवळाई चौक 2, रेल्वे स्टेशन परिसर 3, आर्मी कॅम्प छावणी 1, एन-आठ येथे 1, एन-दोन येथे 2, सातारा परिसर 1,मुंकदवाडी 1, सहकार नगर 1, एन-पाच येथे 1, एन-सहा येथे 2, शिवाजी नगर 2, कांचनवाडी 2, सिटी चौक 1, वेंदात नगर 1, खडकपूरा हनुमान मंदीर चौक 1, इटखेडा 4, सुतगिरणी चौक 1, प्रताप नगर 1, देशमुख नगर 1, सिंधी कॉलनी 1,बन्सीलाल नगर 1, गारखेडा 1,जाधववाडी 1, हर्सुल 1, कटकट गेट 1, अन्य 50
ग्रामीण (17) -
औरंगाबाद 7, गंगापूर 1, कन्नड 1, खुलताबाद 1, वैजापूर 6, सोयगाव 1
मृत्यू (02)
घाटी (01)
45 पुरुष, मिसरवाडी ता.औरंगाबाद
खासगी (01)
73 पुरुष, ता.वैजापूर