औरंगाबाद - महाविकास आघाडीचे राज्याचे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान पाटील भुमरे विरोधात शुक्रवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जन आंदोलन केले. शासनाची जागा खरेदी करत घरकुल लाटण्याचे आरोप मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर करण्यात आले आहेत.
पैठणच्या मध्यभागी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन संदिपान भुमरे व त्यांच्या साथीदारांनी लाटल्याचा आरोप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांनी शुक्रवारी शिवाजी पुतळा या ठिकाणी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
जागा लाटण्याचा प्रताप
महाविकास आघाडीचे शिवसेना नामदार संदीपान पाटील भुमरे यांनी आपल्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत अनेक भ्रष्टाचार केले. मात्र, मंत्री झाल्यानंतरही थांबले नसून त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारची पैठण शहरातील मोक्याची जागा लाटण्याचा प्रताप केला आहे. यात त्यांचे साथीदार व नातेवाईक सामील असून ह्यापुढे मी प्रत्येक गोष्टीला त्यांना मज्जाव करणार आहे, असेही दत्ता गोयंडे म्हणाले.
सहा लोकांनाच झाला घरकुल मंजूर
गेले कित्येक वर्षापासून तालुक्यातील अनेक लोक शासनाच्या जमिनीवर राहत आहेत. त्यांना पीआर कार्ड आणि घरकुल मंजूर करून देणे हे महत्वाचे काम आहे. तालुक्यातून 572 लोकांची यादी प्रशासनाने काढली आहे. त्यापैकी फक्त सहा लोकांनाच कसा घरकुल मंजूर होतो असा प्रश्न त्यांनी विचारला. हे सहा लोक मंत्री संदीपान पाटील भुमरे यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवारातील असून, घरकुल योजनेद्वारे करोडो रुपयांची जमीन लाटण्याचा प्रकार होत आहे.
हेही वाचा - सोलापुरात पंढरपूरसह पाच तालुक्यात संचारबंदी, संचारबंदीला व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध