ETV Bharat / city

MLA Amol Mitkari Criticism : हे बेकायदेशीर सरकार लवकरच पडणार - आमदार अमोल मिटकरी - न्यायमूर्ती रमन्ना

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी ( NCP MLA Amol Mitkari Criticism ) यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नवीन सरकारवर टीका ( Criticism of New Government ) केली. हे सरकार बेकायदेशीर असल्यामुळे ( Lack of Cabinet in State ) न्यायमूर्ती रमन्ना ( Justice Ramanna ) लवकरच निर्णय घेतील आणि न्याय देतील. त्यामुळे हे सरकार पडणार आहे. हे सरकार औटघटकेचे ठरेल, असेही ते म्हणाले.

NCP MLA Amol Mitkari
राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी
author img

By

Published : Jul 28, 2022, 6:55 AM IST

Updated : Jul 28, 2022, 8:02 AM IST

औरंगाबाद : महाराष्ट्र सध्या संकटात आहे. मंत्रिमंडळ नसल्यामुळे ( Lack of Cabinet in State ) महाराष्ट्रात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. हे सरकार बेकायदेशीर सरकार आहे. सरन्यायाधीश व्ही. रमन्ना ( Justice Ramanna ) लवकर निर्णय घेतील आणि न्याय देतील. सरकार पडणार आहे, हे सरकार औटघटकेचं सरकार ठरेल, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधताना नवीन सरकारवर टीका ( Criticism of New Government ) केली.

बंडखोर आमदारांच्या शुभेच्छांचा उपयोग नाही : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला बंडखोर आमदारांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यात माजी मुख्यमंत्री असे म्हणाले आहेत. या शुभेच्छांना काही अर्थ नाही. खरा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. बंडखोर आमदारांनी दिलेल्या शुभेच्छा काही मनातून दिलेल्या शुभेच्छा नाहीत. त्यांनी कशाही शुभेच्छा दिल्या तरी त्याला काही महत्त्व नाही. बंडखोर आमदार पुन्हा निवडून येणारे नाहीत, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी

राष्ट्रपती यांच्या नावापुढे जात का : आमचे रक्त काढले तर त्यातून फुले-शाहू-आंबेडकर बाहेर निघतील. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, त्याच्यापुढे त्यांची आदिवासी ही जात लावली. पण शपथ घेण्याच्या आधी मंत्रोच्चार केला गेला, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी भर कार्यक्रमात मंत्रोच्चाराची क्लिप वाजवली. शिल्पकार देवरे यांनी कुठल्या शिल्पाचा अभ्यास केला माहिती नाही. सिंहाचे जबडे बंद होते, पण या सिंहाचे जबडे उघडे आहेत. पण, रमन्ना यांनी सांगितले की अशोकस्तंभावरील सिंह संविधानाला धरून नाहीत. रमन्ना यांचे दोन महिने रिटायरमेंटचे राहिले आहेत, तोपर्यंत काही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही.

एकनाथ शिंदे मंत्रालयात गेले असतानाही झाला मंत्रोच्चार व पूजाविधी : एकनाथ शिंदे ज्या दिवशी मंत्रालयात गेले, त्यादिवशी तिथे पण पूजाविधी केला. उद्या मुस्लिम मुख्यमंत्री झाला, तर तो म्हणेल मी नमाज पढतो. बौद्ध गेला तर, तो म्हणेल मी बुद्धवंदना म्हणतो. जर तुम्ही राजकारणात असाल तर राष्ट्रधर्म हाच तुमचा धर्म असला पाहिजे, अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली. रवी राणा हनुमान चालिसा घेऊन फिरतात. मग मी पण संविधान घेऊन गेलो.

बाबासाहेब पुरंदरेंनी शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहला : राज ठाकरे यांनी पुरंदरेचे समर्थन केले. पण, बाबा पुरंदरे इतका खोटा इतिहास कुणी लिहिला नाही. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी त्यांचा समाचार घेतला. शाहू महाराज हे मल्लखांब, कुस्तीवाले होते, योगा-प्राणायामवाले नव्हते. भीमा कोरेगावची दंगल भडकवणाऱ्या माकडासारखे शाहू महाराजांचे शरीर नव्हते, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.

हेही वाचा : Maharashtra Cabinet : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा; युवकांवर दाखल झालेले 'ते' गुन्हे मागे घेणार

Last Updated : Jul 28, 2022, 8:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.