औरंगाबाद - अखेरच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव असं करण्यात आलं. तर, नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आलं. यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत हात झटकले आहेत. नामांतर हा किमान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत निर्णय होता. याची कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण पवार यांनी दिलं ( Sharad Pawar React On Aurangabad Renaming ) आहे.
"नामांतर ऐवजी नागरिकांच्या हिताचा..." - शरद पवार औैरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. पवार म्हणाले की, नामांतर हा किमान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकार कक्षेत निर्णय होता. याची कल्पना नव्हती. शासकीय धोरणाबाबत चर्चा होत होती. नामांतर ऐवजी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला असता तर आनंद झाला असता, असेही पवार यांनी म्हटलं.
"आमचा काळातील बंड एक दिवसाचा" - काही तरी प्रेम प्रकरण सुरु होत आम्हाला उशिरा कळालं. कर्नाटकमध्ये काय झालं, महाराष्ट्रात काय झालं, गोव्यात काय होऊ लागलं, लोकशाहीच्या संस्था उध्वस्त करण्याचे काम होत आहे. गोवा इतक जवळ आहे, इतका उशीर कसा झाला माहिती नाही. आमच्या काळातील बंड एक दिवसाचा होता, सहा जणांनी राजीनामे दिले, आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. आज सुरत, गोहाटी, गोवा असं होतंय, असा टोलाही पवार यांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.
"महाविकास आघाडीबाबत मित्र पक्षांसोबत..." - एक गोष्ट खरी आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी अनेक बैठका घेतल्या, निर्णय घेतले फक्त त्याचा गाजबाजा केला नाही. शिवसेना कोणाची हे न्यायालय ठरवेल. हे सरकार पाडण्याचं लक्ष नाही, त्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवणे, पक्षाला बळकटी देणे आणि आगामी निवडणुकीत सर्वसामान्यांना उत्तर देण्यासाठी तयार राहायचं, अशी आमची भूमिका आहे. मध्यवती निवडणूक घेण्याची मागणी शिवसेनेची आहे. तसं झाल तर कळेल की गेलेल्या आमदारांचा निर्णय राज्याच्या भल्याचा होता की स्व:भल्याचा हे समोर येईल. पुढील निवडणुकीत पूर्ण शक्तीने लढणार आहोत. महाविकास आघाडीबाबत मित्र पक्षांसोबत बोलण नाही, मात्र यावर सर्वांनी विचार करायला पाहिजे. एकनाथ शिंदे म्हणतात 200 आमदार निवडूण आणणार त्यांच्या बोलण्यात काही तरी चुकले आहेत. महाराष्ट्रात 288 आमदार आहेत, तर सत्ता नव्हती तर काही लोक अस्वस्थ होते. आता त्यांची अस्वस्थता कमी झाली असेल, असा टोमणा शरद पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लगावला आहे.
"सर्वसामान्यांना महागाईत लोटण्याचा प्रयत्न" - श्रीलंकेच्या परिस्थितीबाबत शरद पवार यांनी पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं. पवार म्हणाले, श्रीलंकेच्या बाबतीत माझ्या मनात शंका आहे. त्यात राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री एकाच कुटुंबातील होते. सत्ता अधिक लोकांत असावी, मात्र तिथे केंद्रित झाली होती. त्याची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात आली असावी, काळजी करण्याची गरज आहे. कारण ते आपले शेजारी आहेत. सत्ता केंद्रित झाल्यावर काय होत हे यामुळे दिसलं, असे त्यांनी सांगितलं. तसेच, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर 5% टक्के जीएसटीचा लावण्याचा निर्णय कोणालाही विचारात न घेता घेतला गेला. सर्वसामान्यांना महागाईत लोटण्याचा प्रयत्न आहे. अधिवेशनात आम्ही याबाबत जाब विचारू, असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.