औरंगाबाद - कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा औरंगाबादच्या एका नागरिकांनी केला आहे. इतकंच नाही तर या पित्याने एक हजार कोटींचा दावा ( Father Claiming Rs 1 Crore In Damages ) मुंबई उच्च न्यायालयात दाखल ( Father Ran To High Court Mumbai ) केला आहे.
असे आहे प्रकरण -
दिलीप लुणावत असे याचिकाकर्त्यांचे नाव आहे. त्यांची मुलगी डॉ स्नेहल लुणावत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दंत महाविद्यालयात होती. डॉ. स्नेहलने 28 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. परंतु 1 मार्च 2021 मध्ये तीच मृत्यू झाला. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस असुरक्षित असल्याचे म्हणले आहे. परंतु हा दावा खोट्या व चुकीचा असल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
एक हजार कोटींचा दावा -
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याने दिलीप लुणावत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार सोबत लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भागीदार यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या एफईएफआय या समितीने मुलीची कोरोना लसीच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाल्याचे मान्य केल्याचे याचिकेत नमूद केल आहे. त्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि इतर लोकांचे प्राण वाचावेत म्हणून याचिका दाखल केल्याचे लुणावत यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Leopard attack on child Sangli : ऊसतोड कामगाराच्या 5 वर्षाच्या बालकावर बिबट्याचा हल्ला