ETV Bharat / city

MURDER : औरंगाबादेत तरुणाचा खून, आईच्या तक्रारीवरुन गुंडाविरोधात गुन्हा दाखल

आंबेडकर नगर येथे गुंडाच्या टोळक्याने २२ वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Murder of youth in Aurangabad
औरंगाबादेत तरुणाचा खून
author img

By

Published : Nov 16, 2021, 7:35 AM IST

औरंगाबाद - आंबेडकर नगर (Ambedkar Nagar) येथे गुंडाच्या टोळक्याने २२ वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात (CIDCO Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश नारायण घुगे (२२, रा. शिवनेरी कॉलनी) असे मयताचे नाव आहे. योगेशचा परिसरातील सराईत गुन्हेगार सचिन गायकवाड सोबत वाद होता. शनिवारी सायंकाळी सचिनने मित्रांना सोबत आणत योगेश यास घराच्या जवळच मारहाण केली. तेव्हा योगेशच्या आईने सचिनच्या पाया पडून त्याच्या तावडीतून मुलाला सोडवले होते. हा वाद तेव्हा मिटला होता.

पहाटे तीन वाजता केला खून

त्याच रात्री योगेशला मित्रांनी मध्यरात्री एक वाजता बोलावल्यामुळे तो घराबाहेर पडला. दरम्यान योगेशला गुंडाच्या टोळक्याने बेदम मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला. पहाटे तीन वाजता योगेशच्या आईला एक फोन आला. योगेश आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीजवळ बेशुद्धावस्थेत असल्याची माहिती फोन करणाऱ्याने दिली. योगेशच्या आईने व नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. याची माहिती आईनेच सिडको पोलिसांना दिली. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी घाटी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. योगेशच्या आईच्या तक्रारीवरून सचिन गायकवाड याच्यासह इतरांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.