औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील यांनी मला जाहीररीत्या गाडीखाली चिरडण्याची धमकी दिली, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जलील यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रारही दिली आहे.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पत्रकार परिषदेत माझे नाव न घेता माझ्यावर आरोप करण्यात आले होते. तर जाहीररीत्या मला गाडीखाली चिरडून टाकेल, असे वक्तव्य जलील यांनी केले. तर त्यांचे कार्यकर्ते मला पांढरे कफन घालणार असल्याच्या क्लिप व्हायरल करत आहेत. मी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक आहे, मी एमआयएमचे काम केले नाही, यामुळे माझ्यावर सूड उगवला जात आहे. माझ्या जीवाला काही झाल्यास जलील हे जबाबदार राहतील, अशी लेखी तक्रार अफसर खान यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे केली आहे.