ETV Bharat / city

Raj Thackeray Birthday Celebration : राज ठाकरेंच्या 54 व्या वाढदिवशी मनसेतर्फे 54 रुपयांमध्ये पेट्रोल! - Raj Thackeray Birthday Celebration

मनसे अध्यक्ष (MNS president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवसनिमित्त (On the occasion of Raj Thackeray birthday) औरंगाबाद मनसेतर्फे 54 रुपयांमध्ये एक लिटर पेट्रोल (Petrol at Rs 54 Per Liter) देण्यात आले. नागरिकांना महागाईपासून दिलासा (Relief From Inflation) देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर (MNS District President Sumit Khambekar) यांनी दिली.

For Birthday Celebration Petrol at Rs 54 from MNS
वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे 54 रुपयांत पेट्रोल
author img

By

Published : Jun 14, 2022, 1:43 PM IST

Updated : Jun 14, 2022, 2:36 PM IST

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त औरंगाबाद मनसेतर्फे 54 रुपयांमध्ये एक लिटर पेट्रोल देण्यात आले. नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली.

वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे 54 रुपयांत पेट्रोल

संकल्पना 54 वा वाढदिवस 54 रुपयांना पेट्रोल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 54 वा वाढदिवस कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. त्यानिमित्ताने क्रांती चौक भागात 54 रुपये लिटर दराने पेट्रोल देण्यात आले. सकाळी 8 ते 9 या काळात प्रत्येकाला एक लिटर पेट्रोल देण्यात आले. महागाई वाढत चालली असून, पेट्रोलचे दर शंभरी पार आहेत. जीवनावश्यक वस्तू असल्याने नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पेट्रोल देण्यात आले आहे. एक दिवस का होईना नागरिकांना दिलासा मिळेल याकरिता हा उपक्रम राबवला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली.

नागरिकांनी केली मोठी गर्दी : मनसेतर्फे 54 रुपयांमध्ये पेट्रोल मिळणार असल्याने नागरिकांनी सकाळी 6 वाजल्यापासून क्रांती चौक पेट्रोल पंप येथे गर्दी केली होती. अर्धा किलोमीटरपर्यंत नागरिकांची गर्दी उसळली होती. मनसेतर्फे एक लिटर पेट्रोलचे कुपन तयार करून नागरिकांना दिले. हे कुपन देऊन एक लिटर पेट्रोल 54 रुपयांत देण्याची व्यवस्था करण्यात आली. जवळपास एक हजार नागरिकांना पेट्रोल दरात सवलत देण्यात आल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितलं. तर एक लिटर पेट्रोल पुरेसे नसले तरी एक दिवस का होईना दिलासा मिळाला असून, केंद्र आणि राज्य सरकारने अशी सवलत नेहमीसाठी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : Raj Thackreay राज ठाकरे यांचा आज वाढदिवस, कसा राहिला राज यांचा आजवरचा जीवनप्रवास

Last Updated : Jun 14, 2022, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.