ETV Bharat / city

शिक्षण संस्थाचालकाचे अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे, मुंबईतील सुधारगृहात पीडितांचा खुलासा - औरंगाबाद वसितगृहातील मुलीवर अत्याचार

चौघी मुली १६ जुलै रोजी शिक्षणसंस्थेतून पळून गेल्या. यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केल्यानंतर त्या लासूर रेल्वेस्थानकावर सापडल्या. १३ ऑगस्ट रोजी मुलींना मुंबईच्या बालगृहात पाठवण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक चारू भारती, धनश्री घारगे यांनी मुलींची चौकशी केली तेव्हा अकरा वर्षीय मुलीने धक्कादायक प्रकार सांगितला.

अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे,
अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे,
author img

By

Published : Sep 5, 2021, 1:54 PM IST

औरंगाबाद - सातार परिसरातील शिक्षण संस्थेतून काही दिवसांपूर्वी चार मुली पळून गेल्याची घटना उघडकीस आली होती. यामुली लासूर स्टेशन येथे सापडल्यानंतर त्यांची रवानगी मुंबईच्या बालगृहात करण्यात आली. मात्र सुधारगृहात आलेल्या मुलींनी त्या पळून जाण्यामागे एका धक्कादायक कारणांचा खुलासा केला आहे. त्या चारही मुली ज्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेत होत्या. त्या संस्थेचा संस्थाचालक श्यामसुंदर कनके हा या मुलींशी अश्लील चाळे करत होता, तसेच बेल्टने मारहाण करत होता, असा धक्कादायक खुलासा या पीडित मुलींनी केला आहे. यानंतर डोंगरी पोलिस ठाण्यात कनकेवर गुन्हा दाखल करून प्रकरण सातारा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील चार मुलींनी तीन वर्षांपूर्वी शिक्षणासाठी सातारा परिसरातील संस्थेत प्रवेश घेतला होता. चौघी मुली १६ जुलै रोजी शिक्षणसंस्थेतून पळून गेल्या. यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केल्यानंतर त्या लासूर रेल्वेस्थानकावर सापडल्या. १३ ऑगस्ट रोजी मुलींना मुंबईच्या बालगृहात पाठवण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक चारू भारती, धनश्री घारगे यांनी मुलींची चौकशी केली तेव्हा अकरा वर्षीय मुलीने धक्कादायक प्रकार सांगितला.

वसतिगृहात रहात असताना संचालक कनकेने तिला आणि तिच्या बहिणीला नवीन गणवेश घेण्यासाठी दालनात बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याच्यासोबत गैरप्रकार केला होता. तसेच तो नेहमीच संस्थेतील मुलींना बेल्टने मारहाण करत होता, अशी धक्कादायक माहिती या सुधारगृहातील मुलींनी सांगितले. या प्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार व अट्रॉसिटीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कनके फरार-

दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करून डोंगरी पोलिसांनी तो सातारा पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. मात्र कनकेला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच तो संस्था सोडून फरार झाला आहे. तसेच कनकेने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यावर ७ सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.