ETV Bharat / city

इम्तियाज जलील हे माझेच पाप, आमच्यावर उलटणार असेल तर शेवटचा मंत्र मारू - अब्दुल सत्तार - MP Imtiaz Jaleel on cm thackeray

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (17 सप्टेंबर) औरंगाबाद शहरात येणार आहेत. त्यावेळी मराठवाड्याचा विकास (न) केल्यामुळे एमआयएम सत्कार करुन उपरोधिक आंदोलन करणार आहे. याला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले आहे.

minister Abdul Sattar
अब्दुल सत्तार
author img

By

Published : Sep 16, 2021, 7:12 PM IST

Updated : Sep 16, 2021, 7:34 PM IST

औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील हे माझेच पाप आहे, आज जर ते आमच्यावर उलटणार असेल तर त्याचा शेवटचा मंत्र आमच्याकडे आहे, तो आम्ही वापरू आणि त्यांना घरी पाठवू, असा टोला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाणी परिषदेत लगावला.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार
  • मुख्यमंत्र्यांना एमआयएमसह अन्य पक्षांनी केला विरोध -

हेही वाचा - मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी (17 सप्टेंबर) औरंगाबाद शहरात येणार आहेत. त्यावेळी मराठवाड्याचा विकास (न) केल्यामुळे एमआयएम सत्कार करुन उपरोधिक आंदोलन करणार आहे, त्याबरोबर मनसे त्यांच्या स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्यावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका करत, असे आंदोलन करून हे लोकं मराठवाड्याच्या विकासाची गती कमी करू पाहत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाला घाबरणार नाहीत, ते येतील आणि कामांचा शुभारंभ करणार, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील यांनी कोणता विकास केला? ते पाच वर्षे आमदार तर आता खासदार आहेत तर महानगरपालिकेत 26 नगरसेवक आहेत. मग त्यांच्या वार्डात काय काम झाले? याचा अहवाल त्यांना द्यावा लागणार आहे, अशी टीका देखील अब्दुल सत्तार यांनी केली.

  • दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी घरचे प्रश्न सोडवावेत -

मराठवाड्यात दोन केंद्रीय मंत्री आहेत. त्यात एका मंत्र्यांकडे रेल्वे खातं तर दुसऱ्यांकडे अर्थ खाते आहे. लातूर-जळगाव रेल्वे मार्गाचे काम प्रलंबित आहे. 17 वर्षांपूर्वी त्याचा सर्व्हे देखील झालाय. हा रेल्वेमंत्र्यांच्या मतदार संघातील प्रलंबित प्रश्न असून त्यांनी तो मार्गी लावावा, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सत्तार यांनी लगावला. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी राज्याच्या जीएसटीचे थकलेले पैसे मिळवून द्यावेत, आपल्या राज्याचे प्रश्न सोडवावेत, असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.

  • पाण्याचा प्रश्न महत्वाचा -

तापडिया नाट्य मंदिर येथे पाणी परिषद राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पार पडली. मराठवाड्याचा पाणी प्रश्न महत्वाचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक असून, पाण्याचा गंभीर प्रश्न लवकर सुटेल. औरंगाबाद शहरासाठी असलेली पाणी योजना वेळेत पूर्ण होईल आणि प्रत्येकाच्या घरात पुरेसे पाणी मिळेल, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी पाणी परिषदेत व्यक्त केला.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचे तुतारी वाजवून स्वागत, इम्तियाज जलील करणार उपरोधिक आंदोलन

Last Updated : Sep 16, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.