ETV Bharat / city

शाळा संघटना आक्रमक, मेसाचा इशारा तर, शाळा सुरू केल्याचा मेस्टाचा दावा - मेसा संघटना आंदोलन औरंगाबाद

राज्य सरकारच्या शाळा बंद करण्याचा निर्णयाविरोधात सर्व खासगी शाळाचालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, शाळा लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही 27 जानेवारी रोजी शाळा सुरू करू, असा इशारा मेसा संघटनेचे ( MESA organization protest in Aurangabad ) अध्यक्ष प्रल्हाद शिंदे ( MESA organization Pralhad Shinde) यांनी दिला.

MESA organization Pralhad Shinde
मेसा संघटना आंदोलन औरंगाबाद
author img

By

Published : Jan 17, 2022, 4:00 PM IST

औरंगाबाद - राज्य सरकारच्या शाळा बंद करण्याचा निर्णयाविरोधात सर्व खासगी शाळाचालक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, शाळा लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही 27 जानेवारी रोजी शाळा सुरू करू, असा इशारा मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे ( MESA organization Pralhad Shinde) यांनी दिला.

माहिती देताना मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे

हेही वाचा - Aurangabad Corona Update : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मूलं होत आहेत कोरोनाबाधित, 'अशी' घ्या काळजी

आरटीईचे अनुदान देण्याची मागणी

सरकारी धोरणाविरोधात काळे कपडे घालून - छत्री डोक्यावर घेऊन मेसा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले ( MESA organization protest in Aurangabad ). काही वर्षांत सरकारकडून शाळांना देण्यात येणारे आरटीईचे अनुदान देखील मिळाले नाही. कोरोनामुळे संस्थाचालक त्रस्त आहेत आणि त्यात सरकारने अद्याप पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे, शाळा चालवणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्यांच्याकडील थकीत अनुदान तातडीने द्यावा, अशी मागणी मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरील आंदोलनात केली.

शाळा संघटना आणि सरकारमध्ये संघर्ष

मेसा संघटनेने आंदोलन करत 26 जानेवारीच्या आत शाळा सुरू करा, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता सरकारने निर्णय बदलावा, अन्यथा 27 जानेवारीपासून शाळा सुरू करू, असा इशारा मेसा अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी दिला. तर, मेस्टा संघटनेचे ( MESTA Organization Sanjay Tayde Patil ) अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी आज, 17 जानेवारीपासून शाळा सुरू केल्याचा दावा केला आहे. राज्यात काही शाळांनी पालकांच्या संमतीने शाळा सुरू केल्या आहेत, असा दावा मेस्टाचे संजय तायडे पाटील यांनी केला. त्यामुळे, शाळा संघटना आणि सरकारमध्ये नवा संघर्ष उभा राहत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - Home Test Kit : घरीच कोरोना चाचणी करताना घ्या 'ही' काळजी, निकाल 30 टक्केच बरोबर?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.