ETV Bharat / city

Aurangabad Election 2022 : 'बायको पाहिजे' औरंगाबादमध्ये बॅनरची चर्चा; संतप्त नागरिकांनी शाही फेकत केला निषेध

author img

By

Published : Jan 30, 2022, 2:50 PM IST

Updated : Jan 31, 2022, 5:04 AM IST

औरंगाबाद महापालिका निवडणूक ( Aurangabad Municipal Corporation Election ) लढवण्यासाठी एका व्यक्तीने बायको पाहिजे, अशा आशयाचे बॅनर्स ( Bayko havi banners in Auragnabad ) शहरात लावले आहे. हे बॅनर पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करताना दिसून येत आहेत. दरम्यान, हे बॅनर पाहून संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते व महिलांनी शाही फेकत बॅनर फाडून टाकले आहे. तसेच या घटनेचा जाहीर निषेधही केला आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद

औरंगाबाद - येत्या काही दिवसांत राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका ( Municipal Corporation Elections ) होणार आहेत. निवडणुकांचे वेळापत्रक हे कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच औरंगाबाद महापालिका निवडणूक ( Aurangabad Municipal Corporation Election ) लढवण्यासाठी एका व्यक्तीने बायको पाहिजे, अशा आशयाचे बॅनर्स ( Bayko havi banners in Auragnabad ) शहरात लावले आहे. शनिवारी रात्रीपासून या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच जातीची कुठलीही अट नाही, असंही या बॅनरवर लिहिलं आहे. दरम्यान, हे बॅनर पाहून संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते व महिलांनी शाही फेकत बॅनर फाडून टाकले आहे. तसेच या घटनेचा जाहीर निषेधही केला आहे.

औरंगाबादमध्ये लागले 'बायको पाहिजे' या आशयाचे बॅनर
पोलिस आयुक्तांची भेट घेऊन देणार तक्रार

स्वतःच्या स्वार्थासाठी बायको पाहिजे असे आक्षेपार्ह बॅनर लावणे म्हणजे महिलांचा अपमान करणे आहे. अशा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीची धिंड काढली पाहिजे असे म्हणत या प्रकरणी पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल करणार असल्याचही येथील सामाजिक कार्यकर्ते म्हणाले आहेत. तसेच या प्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची देखील भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

औरंगाबादमधील रमेश पाटील ( Ramesh Patil Aurangabad ) या व्यक्तीला आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी हवी आहे. मात्र, रमेश पाटील यांना पहिल्या पत्नीपासून तीन अपत्य असल्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकत नाहीत. त्यामुळे उमेदवार बायको पाहिजे, असे बॅनर्स रमेश पाटील यांनी शहरात लावले आहेत. हे बॅनर पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करताना दिसून येत आहेत.

काय आहे बॅनर्सवर?

या बॅनर्सवर छापण्यात आले आहे की, विवाहासाठी कुठल्याही जातीची महिला चालेल. वय वर्ष 25 ते 40 वयोगटातील अविवाहीत, विधवा किंवा घटस्फोटीत महिला चालेल. पण, त्यात एक अट ठेवण्यात आली आहे. या महिलांना दोनच अपत्य असावी. जास्त असेल तर त्या महिलांना स्वीकारण्यात येणार नाही. ज्या महिला इच्छूक असतील त्यांनी यावं. त्यांचं स्वागत आहे. याच बॅनरवर रमेश पाटील यांचा मोठा फोटोही लावण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात दुरूस्ती करून तीन अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढण्याचा अधिकार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.

हेही वाचा - बायको घर सोडून गेल्यामुळे नवरा चढला टॉवरवर; पाहा व्हिडिओ

Last Updated : Jan 31, 2022, 5:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.