ETV Bharat / city

Narmada Bus River Accident : मुलाचे ऐकले असते तर... पचोड येथील हॉटेल व्यावसायिकाचे वाचले असते प्राण

author img

By

Published : Jul 19, 2022, 7:43 AM IST

Updated : Jul 19, 2022, 7:56 AM IST

मध्य प्रदेशातील इंदूरहून जळगाव जिल्ह्याच्या अंमळनेरकडे जाणारी बस खरगोन येथे नर्मदा नदीत ( Maharashtra Bus Accident ) कोसळली. या भीषण अपघातात ( Maharashtra ST Bus Accident ) वाहनचालक आणि वाहकांसह 13 जणांचा मृत्यू झाला ( Msrtc ST Bus Fell Into Narmada River 13 Dead ) आहे. या अपघातानंतर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारकडून बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाने बसचा सांगाडा नदीतून बाहेर काढला असून, यातील 8 जणांची ओळख पटली आहे. इंदोर अपघातात दगावलेल्यांमध्ये जिल्ह्यातील पाचोडच्या जगन्नाथ जोशींचा समावेश असल्याची ( Jagannath Joshi of Pachod in Aurangabad  ) माहिती समोर आली आहे. राजस्थानात पत्नीला सोडून येताना झालेल्या या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

Jagannath Joshi Died in Indore Accident
इंदोर अपघातातील मयत जगन्नाथ जोशी

औरंगाबाद : मध्य प्रदेशातील इंदूरहून जळगाव जिल्ह्याच्या अंमळनेरकडे जाणारी बस खरगोन येथे नर्मदा नदीत ( Maharashtra Bus Accident ) कोसळली. या भीषण अपघातात वाहनचालक आणि वाहकांसह 13 जणांचा मृत्यू झाला ( Msrtc ST Bus Fell Into Narmada River 13 Dead ) आहे. या अपघातात पचोड येथील हॉटेल व्यावसायिक जगन्नाथ हेमराज जोशी यांचाही समावेश आहे. त्यांच्या मुलाने त्यांना बसने येऊ नका, असे सांगितले होते.

मध्यप्रदेशातील एसटी बसच्या अपघातानंतर ( Maharashtra ST Bus Accident ) मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारकडून बचाव कार्य सुरू आहे. प्रशासनाने बसचा सांगाडा नदीतून बाहेर काढला आहे. यातील 8 जणांची ओळख पटली आहे. इंदोर अपघातात दगावलेल्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोडच्या जगन्नाथ जोशींचा ( Jagannath Joshi of Pachod in Aurangabad )समावेश असल्याची माहिती समोर ( Pachod Hotelier Dies in Bus Accident ) आली आहे. राजस्थानात पत्नीला सोडून येताना झालेल्या या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

अपघातात झाला मृत्यू : मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथील बलकवाडा - खलटाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत नर्मदा नदीच्या पुलावरून बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात दगावलेल्यांमध्ये पैठण तालुक्यातील पाचोड येथील ७० वर्षीय जगन्नाथ हेमराज जोशी यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. पत्नीला राजस्थानात गावी सोडून परत येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

जगन्नाथ यांचा अखेरचा प्रवास ठरला : जगन्नाथ जोशी हे मूळचे मल्लाडा, ता. सराडा, जि. उदयपूर, राजस्थान येथील रहिवासी होते. ते गेल्या चाळीस वर्षांपासून पाचोड येथे कुटुंबीयांसोबत राहत होते. ते हॉटेल व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. सहा जून रोजी त्यांचा वाढदिवस झाला. यंदा त्यांचा मुलगा प्रकाश यांनी मोठ्या थाटात वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर जगन्नाथ जोशी पत्नीला सोडण्यासाठी मल्लाडा येथे गेले होते. पत्नीला आई-वडिलांकडे गावी सोडून परत पाचोडला येत असतानाच ते येत असलेल्या बसला अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला.

मुलाने बसने येण्यास दिला होता नकार : पाचोडला येत असताना बसमध्ये बसण्यापूर्वी मुलगा प्रकाशला मोबाईलवरून संपर्क साधून आपण येत असल्याची कल्पना दिली होती. सकाळी साडेसात वाजता त्या दोघांमध्ये झालेले संभाषण अखेरचे ठरले. प्रकाशने त्यांना बसने न येण्याबद्दल बजावले होते. पण त्यांनी ऐकले नाही आणि हाच त्यांचा शेवटचा बसप्रवास ठरला. जगन्नाथ जोशी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा मृतदेह धार येथील रुग्णालयात ठेवण्यात आला असून, मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Maharashtra Bus Accident : मध्यप्रदेशात एसटी बसचा अपघात, 13 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत

हेही वाचा : Amalner-Indore Bus Accident : अमळनेर-इंदोर बस अपघात प्रकरणी हेल्पलाईन क्रमांक जारी

Last Updated : Jul 19, 2022, 7:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.