ETV Bharat / city

नामांतरसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे २६ जानेवरीचा अल्टिमेटम

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

sambhajinagar namantr mns
sambhajinagar namantr mns
author img

By

Published : Jan 20, 2021, 12:29 AM IST

औरंगाबाद - शहराचे नामकरण करण्याचा मुद्दा राज्यभर गाजत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. येत्या 26 जानेवारीपर्यंत औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर नामांतर करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे.

३२ वर्षांपासून विषय रेंगाळला -

गेल्या ३२ वर्षांपासून औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय रेंगाळत आहे. महानगर पालिकेत नमाकरणाचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. तसेच राज ठाकरे यांनी देखील २०१९ मध्ये संभाजीनगर नावासाठी शासनाला आवाहन केले होते. तसेच शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे या करिता २६ जानेवारी पर्यंतचा इशारा देखील दिला आहे.

विभागीय आयुक्तांना निवेदन -

मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात छत्रपती संभाजीनगर नामांतराचा अध्यादेश २७ जानेवारीपर्यंत काढण्याचे अल्टिमेट्म देण्यात आला आहे. या वेळी जिल्हाप्रमुख सुहास दशरथे, संदीप कुलकर्णी, नूतन जैस्वाल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.