औरंगाबाद - महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारणीवरून आता राजकारण तापत (Maharana Pratap statue dispute) चाललं आहे. महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने एखादी सैनिकी शाळा सुरू करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. मात्र त्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरुद्ध टीका केली आहे तर (politics over Maharana Pratap statue) राजपूत समाजाने आंदोलन पुकारले आहे.
काय आहे प्रकरण -
जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार अतुल सावे, सेना आमदार अंबादास दानवे यांनी सिडको भागात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती. त्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांच्या जवळपास खर्च हा अपेक्षित आहे. मात्र त्यावेळेस पुतळा उभारण्यास खा. जलील यांनी विरोध करत पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून, ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिकी शाळा सुरू करण्याची मागणी केली होती आणि त्यासंबंधीचे पत्राद्वारे त्यांनी मागणी केली होती. त्यावरून हा वाद सुरू झाला आहे.
Maharana Pratap statue dispute : महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून तापलं राजकारण.. इम्तियाज जलील-शिवसेना आमने-सामने - महाराणा प्रताप पुतळ्यावरून राजकारण
महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारणीवरून आता राजकारण तापत (Maharana Pratap statue dispute) चाललं आहे. महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने एखादी सैनिकी शाळा सुरू करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. मात्र त्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरुद्ध टीका केली आहे तर (politics over Maharana Pratap statue) राजपूत समाजाने आंदोलन पुकारले आहे.