ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन; शनिवार - रविवार असणार पूर्ण बंद

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 11 मार्च ते 4 एप्रिल याकाळात अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Lockdown in Aurangabad
औरंगाबाद लॉकडाऊन
author img

By

Published : Mar 8, 2021, 8:05 PM IST

Updated : Mar 9, 2021, 1:02 PM IST

औरंगाबाद - औरंगाबाद शहरात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 11 मार्च ते 4 एप्रिल याकाळात अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांच्या झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडून व्यवसायिकांच्या काय आहेत अपेक्षा?

चार एप्रिलपर्यंत धार्मिक स्थळ राहणार बंद

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला. त्याआधी जिल्ह्यातील धार्मिक स्थळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चार महिन्यांआधी धार्मिक स्थळं पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चार एप्रिलपर्यंत पुन्हा धार्मिक स्थळं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना मान्यता असणार नाही, त्यामुळे कोणीही मोर्चे, आंदोलन करू नये असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

शनिवार - रविवार असणार पूर्ण बंद

11 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या काळात रात्री नऊ ते सकाळी सहा बंद असणार आहे. हॉटेल चालकांनी तरी नऊ वाजता हॉटेल बंद करायचे आहे मात्र होम डिलिव्हरी रात्री अकरा पर्यंत करता येणार आहे. मात्र याकाळात दर शनिवारी आणि रविवारी पूर्ण बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे 13 - 14 मार्च, 20 - 21 मार्च, 27 - 28 मार्च, आणि 3 - 4 एप्रिल रोजी जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार आहे. या काळात फक्त दूध, वैद्यकीय सेवा, मीडिया कर्मी, भाजीपाला आणि फळविक्री सुरू असणार आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्प २०२१-२२ : शेती क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद; तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज

चार एप्रिलपर्यंत लग्न समारंभास बंदी

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, लग्न समारंभ करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि त्यात कोविडच्या नियमांचं पालन देखील कोणीही करताना दिसून येत नाही. त्यामुळे रुग्ण संख्या वाढीस लग्न समारंभ कॅरियरच काम करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. याकाळात विवाह करायचा असल्यास नोंदणी पद्धतीने करावा, त्यासाठी यंत्रणा सज्ज केली जाईल अस जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

भाजी मंडई राहणार सात दिवस बंद

शहरातील गर्दीचे ठिकाण कोरोना रुग्ण वाढीसाठी कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः भाजी मार्केटमध्ये गर्दी वाढत असून तिथे कोणीही कोविड नियमांचं पालन करताना दिसत नाही, सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसून येतो, कोणीही मास्क वापरात नाही, त्यामुळे परिस्थिती नियंत्रित राहत नसल्याने 11 मार्च ते 17 मार्च याकाळात जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात बाजारमधील व्यावसायिकांनी कमी गर्दी करून नियमांचं पालन करून बाजार कसा चालवता येईल हे स्पष्ट करावं त्यानंतर पुढील निर्णय घेता येईल असे संकेत चव्हाण यांनी दिले.

शहरात अपुरी पडणार बेड व्यवस्था

औरंगाबाद शहरात जवळपास मनपाने 2250 बेड कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्यापैकी अवघे नऊशे बेड रिक्त राहिले आहेत. त्यात रोज किमान 450 कोरोना पॉसिटीव रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे. रविवारी रात्री पर्यंत 3218 ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण रुग्णसंख्या 52969 इतकी झाली असून 48459 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर 1292 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढत असल्याने शहरात लॉक डाऊन लावण्याचा विचार करण्यात येत आहे. मात्र त्याआधी अंशतः लॉक डाऊन लावून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे.

हेही वाचा - जाणून घ्या, राज्याच्या अर्थसंकल्पातून क्रीडा क्षेत्राला काय मिळणार?

कोविड नियमांचा नागरिकांना पडला विसर

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागलं होतं. कोरोनाची स्थिती सर्वसामान्य होत असताना हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले होते. मात्र कोरोना गेला असा भास जणू नागरिकांना झाला आणि त्यांनी कोविडचे नियम पायदळी घ्यायला सुरुवात केली. रस्त्यांवर गर्दी वाढू लागली, विनामास्क फिरणाऱ्या जगरिकांची संख्या वाढली, अचानकच नागरिकांनी स्वच्छता पाळणे देखील बंद केले. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडायला सुरुवात झाली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रोज 50 ते 60 रुग्ण आढळून येत असताना अचानक रोज 450 पेक्षा अधिक रुग्ण आढळू लागली. त्यामुळेच शहराची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी खबरदारी घेतली नाही तर नक्कीच जिल्हा पुन्हा लॉक डाऊनचे दिशेने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खासदार जलील यांनी केली टीका

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयावर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. कोरोनासोबत यांची बैठक झाली आहे का? की त्यांनी सांगितलं की मी फक्त शनिवार आणि रविवार नागरिकांना त्रास देणार आहे आणि इतर दिवशी नाही. निर्णय घेतला लोकप्रतिनिधींना का विचारात घेतले नाही. आम्हाला इतकी अक्कल नसेल मात्र घेतलेले निर्णय कसे बरोबर आहेत हे तरी समजून सांगायला हवं. अशी टीका त्यांनी केली. लागणारे लग्न रद्द करायला कस सांगू शकता. नोंदणी पद्धतीने लग्न करायला एक महिना आधी नोंदणी करावी लागते. हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीत नाही का? लग्न म्हणजे मुला - मुलींच्या आई वडिलांचे वेगळे स्वप्न असते याची जाणीव ठेवायला हवी होती. तुम्ही काही निर्बंध घालायला हवे होते, मंगल कार्यालयासमोर पोलीस लावणे एखादे पथक नेमून पाहणी करून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणे असे उपाय शक्य झाले असते मात्र तसे का केलं नाही असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

Last Updated : Mar 9, 2021, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.