ETV Bharat / city

Banner waving of BJP Power : देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर पूजेचा मान मिळू दे : भाजपची बॅनरबाजी - भाजपची बॅनरबाजी

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप ( BJP in The State Once Again ) सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर पूजेचा मान ( Devendra Fadnavis on Ashadi Ekadashi ) मिळू दे, अशी प्रार्थना देवाकडे करणारे बॅनर भाजप ( BJP Banner Waving ) कार्यकर्त्यांनी औरंगाबाद शहरात लावले आहेत

Banner hoisting from BJP
भाजपकडून बॅनरबाजी
author img

By

Published : Jun 23, 2022, 12:38 PM IST

Updated : Jun 23, 2022, 1:48 PM IST

औरंगाबाद : एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडानंतर ( After the Rebellion ) राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis is the future CM ) यांना पंढरपूर पूजेचा मान ( Devendra Fadnavis on Ashadi Ekadashi ) मिळू दे, अशी प्रार्थना देवाकडे करणारे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी शहरात लावले आहेत.

सत्तेची समीकरणे : शिवसेनेचे नेते, आमदार आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी 34 आमदार आपल्या समर्थनार्थ असल्याचा दावा केला आहे. त्याचे पत्रही त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पाठवले आहे. आता यात सत्तेची समीकरणे जुळवताना भाजपचे 105 आमदार, त्यात त्यांचे सहकारी अपक्ष, तसेच एकनाथ शिंदे यांच्या गोटातील 34 आमदार मिळाले तर भाजप सहजपणे सत्ता स्थापन करू शकतात. परंतु, यात अपक्ष सोबत किती आहेत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. यातून सत्ता स्थापन झाली तर देवेंद्रजी मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंचे गुवाहाटी समीकरण : एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या अनेक आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे आहेत. अशातच राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावरून राज्यातील अनेक शहरांत बॅनरबाजी सुरू आहे. औरंगाबाद शहरातही क्रांती चौकात देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहे.

भाजपकडून बॅनरबाजी : 'हे माउली तुझा आशीर्वाद सदैव राहू दे, तुझ्या पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी येऊ दे' या आशयाचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहे. यावर कुणाल नितीन मराठे भारतीय जनता पार्टी असे लिहिण्यात आले आहे. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंचे बंड यशस्वी झाल्यात जमा, मॅजिक फिगर 37 ओलांडली, सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग

Last Updated : Jun 23, 2022, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.