ETV Bharat / city

जायकवाडी धरण 98 टक्के भरले; 18 दरवाज्यातून 89 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू - औरंगाबाद ताज्या बातम्या

जायकवाडी धरण हे 98 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या 18 दरवाज्यातून 89 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

जायकवाडी धरण 98 टक्के भरले
जायकवाडी धरण 98 टक्के भरले
author img

By

Published : Sep 30, 2021, 10:57 AM IST

Updated : Sep 30, 2021, 2:05 PM IST

औरंगाबाद (पैठण) - जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून गुरुवारी सकाळी 89 हजार क्यूसेस वेगाने पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

व्हिडीओ

धरणातील पाणीसाठा 98 टक्के -

नगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणातून बुधवार सकाळपासून पाणी सोडण्यात आले. सुरुवातीला 4 नंतर 8 तर आता एकूण 18 दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरच्या बाजूने येणारी पाण्याची आवक प्रमाणे पाण्या विसर्ग सुरू असणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात एकूण 98 टक्के इतका जलसाठा असून 18 दरवाज्यांमधून 89604 क्यूसेस वेगाने पाणी सोडले जात आहे.

रात्री उघडण्यात आले होते 27 दरवाजे -

बुधवारी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली होती. दिवसभरात 18 दरवाज्यांमधून पाणी सोडण्यात येत होते. मात्र, पाण्याची आवक वाढल्याने रात्री 11 च्या सुमारास 9 दरवाजे अर्धा फूट उंचीने उघडण्यात आले. मात्र, सकाळी पाण्याची आवक कमी झाल्याने 9 दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले असून 18 दरवाज्यांमधून 89 हजार क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. जसजशी आवक कमी होईल, तसे तसे दरवाजे बंद होतील, असे जिल्हाप्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अतिवृष्टीतील एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही -ॲड. यशोमती ठाकूर

Last Updated : Sep 30, 2021, 2:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.