ETV Bharat / city

'आज बंद स्वीकारला, तरीही भविष्यातील शाश्वती नाही'; उद्योजकांमध्ये नाराजी

author img

By

Published : Jul 6, 2020, 4:42 PM IST

10 जुलैपासून शहरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार असून यामुळे उद्योग देखील सहभागी होणार आहेत. मात्र उद्योजकांनी यावर नाराजी व्यक्त केलीय. 'आज जरी आम्ही 'बंद'मध्ये सहभागी असलो, तरीही भविष्यातील शाश्वती नाही', अशी भूमिका उद्योजक राम भोगले यांनी मांडली आहे.

aurangabad MIDC news
'आज जरी आम्ही 'बंद'मध्ये सहभागी असलो, तरीही भविष्यातील शाश्वती नाही', अशी भूमिका उद्योजक राम भोगले यांनी मांडली आहे.

औरंगाबाद - 10 जुलैपासून शहरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार असून यामुळे उद्योग देखील सहभागी होणार आहेत. मात्र उद्योजकांनी यावर नाराजी व्यक्त केलीय. 'आज जरी आम्ही 'बंद'मध्ये सहभागी असलो, तरीही भविष्यातील शाश्वती नाही', अशी भूमिका उद्योजक राम भोगले यांनी मांडली आहे.

आज बंद स्वीकारला, तरिही भविष्यातील शाश्वती नाही'; उद्योजकांमध्ये नाराजी
विभागीय आयुक्त कार्यालयात उद्योजक आणि व्यापाऱ्यांनाची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत औरंगाबाद शहर आणि औद्योगिक वसाहती 10 जुलैपासून नऊ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज परिस्थिती जास्त बिकट असल्याने आम्ही या बंदला पाठिंबा देत असल्याचे उद्योजकांनी या बैठकीत सांगितले.औरंगाबाद आणि वाळूज परिसरात वाढणाऱ्या रुग्ण संख्येला उद्योग जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांमध्ये उद्योगांना जबाबदार धरण्यात आले. मात्र हे चुकीचे असल्याचे राम भोगले यांनी सांगितले.

आज 'बंद'ची गरज असल्याचे मान्य करुन आम्ही सहभागी होत आहोत, असे ते म्हणाले. आम्ही सोबत आहोत त्यामुळे आता जी काही व्यवस्था करावी लागणार आहे ती व्यवस्था प्रशासनाने करावी. त्यात कुठे कमी पडू नये. उद्योग सुरू राहण्यासाठी धडपड सुरू असून उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.