ETV Bharat / city

Indian Constitution : डॉ. आंबेडकरांच्या विचारातून साकारले 'संविधान', त्यामुळेच भारत बनतोय सुपर पॉवर

26 जानेवारी हा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी देशाला स्वतःचे संविधान म्हणजेच राज्यघटना मिळाली होती. या राज्यघटनेचे शिल्पकार ठरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधानामुळे आज भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असल्याचे मत संविधान अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे.

indian-constitution
indian-constitution
author img

By

Published : Jan 26, 2022, 5:09 AM IST

औरंगाबाद - 26 जानेवारी हा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी देशाला स्वतःचे संविधान म्हणजेच राज्यघटना मिळाली होती. या राज्यघटनेचे शिल्पकार ठरले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या संविधानामुळे आज भारत महासत्ता होण्याकडे वाटचाल करत असल्याचे मत संविधान अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे.

अनेक राज्यघटनांचा अभ्यास केल्यानंतर निर्माण झाली देशाची राज्यघटना -
देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचे देखील कायदे असावेत, संविधान असावे याबाबत अभ्यास सुरू करण्यात आला. त्यावेळेस मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. त्यावेळी समितीने 60 हून अधिक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यावेळी सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार करण्याचे भाग्य देशाला मिळाले आणि त्यात सर्वात मोठा वाटा राहिला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा.

संविधान निर्मिती प्रक्रियेविषयी सांगताना संविधान अभ्यासक
..असे झाले डॉ. बाबासाहेब मसुदा समितीचे प्रमुख -
देशाचे संविधान तयार करताना वेगवेगळ्या समित्या नेमण्यात आल्या होत्या. मसुदा समितीची गरज होती. त्यावेळी वल्लभ भाई पटेल आणि पंडित नेहरू यांनी एक सल्ला दिला होता. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कायदेतज्ञ सर जेनिंग्स यांचा सल्ला घेण्याच मत व्यक्त करण्यात आले. त्यावेळी महात्मा गांधी यांनी आपल्या देशात तज्ञ असताना बाहेरच्या व्यक्तीची मदत कशाला असं मत व्यक्त करत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुचवलं आणि त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. अशी माहिती अभ्यासक डॉ सतीश ढगे यांनी दिली.
भारताचे संविधान ठरत आहे सर्वात सक्षम -
भारताचे संविधान तयार करत असताना वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये राज्य आणि केंद्राचे संबंध कसे असावे, नागरिकांना अधिकार मिळवण्यासाठी कशी व्यवस्था असावी. संविधानात अनुषंगाने वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये वेगळा समित्यांनी तयार केलेल्या अहवालानुसार काही समान गोष्टी स्वीकारणे, त्यात समन्वय साधणे आणि त्यातून आर्थिक सामाजिक, राजकीय स्थितीचा अभ्यास करून, कसा कायदा असावा याबाबत अभ्यास करण्यात आला. राज्यघटना लिहिण्यात आली आणि हीच राज्यघटना आज सक्षम ठरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे आणि दूरदृष्टीमुळे अतिशय चांगली अशी राज्यघटना तयार झाली आहे. आजही ती संयुक्तिक आहे. भारत आणि पाकिस्तान सोबत स्वतंत्र झाले, मात्र आज पाकिस्तानचे तुकडे झाले आहेत. तिथे अराजकता माजली आहे. मात्र भारत जगात सुपर पॉवर म्हणून पुढे येऊ लागला आहे. ज्यात महत्त्वाचा वाटा आहे तो राज्यघटनेचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असं मत अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.