औरंगाबाद - किराणा दुकानात वाईन विक्रीबाबत (Selling Wine in Supermarket) सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात आता राजकीय टीका सुरू झाली आहे. त्यात कोणत्याही किराणा दुकानात वाईन विक्री सुरू केल्यास ते दुकान आम्ही फोडू असा इशारा एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
'वाईन विक्रीचा निर्णय हा शेतकर्यांच्या हितासाठी घेतला असा राज्य सरकारचा दावा आहे. तसे नसल्यास नुसतं शेतकऱ्यांकडे अन्नधान्य नाही, तर दूध देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यावर एखादा प्रक्रिया करणारा उद्योग किंवा त्यापासून शेतकऱ्यांना फायदा होईल अस का बघितले गेले नसल्याचा' आरोप जलील यांनी केला. इतकेच नाही तर शेतकऱ्यांच्या फायदा जर तुम्हाला वाटत असेल तर शेतकऱ्यांना यापुढचे चरस आणि गांजाची शेती करू द्या अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली.