ETV Bharat / city

तीन घरांचे उध्दार करणारी एकमेव कन्या, म्हणून कन्यादानला महत्त्व - लग्नाचे मुहूर्त

दरवर्षी दिवाळीनंतर तुलसी विवाह होतात. त्यानंतर लगीनघाई सुरू होते. यावर्षी २० नोव्हेंबरपासून लग्नसराईचा धूमधडाका सुरू होणार आहे. नोव्हेंबर २०२१ ते ९ जुलै २०२२ पर्यंत आठ महिन्यांच्या काळात ६३ लग्नतिथी आहेत.

Kanyadan
कन्यादान
author img

By

Published : Nov 16, 2021, 7:13 PM IST

औरंगाबाद : जुने लोक पूर्वीपासून सांगत आले आहेत की, ज्याच्या घरात मुलगी आहे तो भाग्यवान असतो. कारण मुलगी ही मातृकुळ, पित्रुकुळ आणि पतीच कुळ असे तीन घरांच उध्दार करणारी एकमेव कन्या असते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत विवाह सोहळ्यात कन्यादानाला खूप महत्त्व आहे. ही संस्कृती जपली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं पंडित भगवान जोशी महाराज यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.

कन्यादानाचे महत्व सांगताना जोशी महाराज
२० नोव्हेंबरपासून लग्नसराईचा धूमधडाका.. दरवर्षी दिवाळीनंतर तुलसी विवाह होतात. त्यानंतर लगीनघाई सुरू होते. यावर्षी २० नोव्हेंबरपासून लग्नसराईचा धूमधडाका सुरू होणार आहे. नोव्हेंबर २०२१ ते ९ जुलै २०२२ पर्यंत आठ महिन्यांच्या काळात ६३ लग्नतिथी आहेत. लग्नाचा बार उडवण्यासाठी अनेक वधू व वर पक्ष सज्ज झाले असून, नातेवाईकांकडून सोयरिक जुळवण्यावर भर दिला जात आहे.विशिष्ट पद्धतीने जगण्याची पद्धत म्हणजे विवाहभारतीय वैद्यक हिंदू संस्कृती मध्ये सांगितलं आहे की, एकूण सोळा संस्कार सांगितले आहेत.आणि या सोळा संस्करांपैकी एक संस्कार म्हणजे विवाह संस्कार आहे.विवाह म्हणजे मुलगा मुलगी एकत्र एन अस नाही.विवाह म्हणजे भारतीय संस्कृतीची अधरशिला आहे.विशिष्ट पद्धतीने जीवन जगण्याची पद्धत म्हणजे विवाह आहे.वस्तुरुपी भेट वस्तू म्हणजे कन्यादान कन्यादान करतांना मुलीचा हात मुलाच्या हातात देऊन संकल्प युक्त पाणी आई वडिलांनी मुलीच्या हातावर सोडायचं आणि त्यानंतर मुलीने ते मुलाच्या हातावर सोडायचं असत. त्यानंतर मुलीच्या आई वडिलांच्या आर्थिक क्षमतेनुसार तिला वस्तुरुपी भेट वस्तू दिल्या जातात याला कन्यादान असे पंडित भगवान जोशी महाराज यांनी सांगितले.हेही वाचा - गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे सोमय मुंडे कोण आहेत? जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.