औरंगाबाद - खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका 22 वर्षीय परिचरिकेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील रेणुकानगर भागात समोर आली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. ज्योती विलास रणबावले (वय -22, रेणुकानगर, गारखेडा) असे आत्महत्या करणाऱ्या परिचारिकेचे नाव आहे.
मृत ज्योती रेणुकानगर भागात आई आणि लहान बहीणी सह भाड्याच्या घरात राहतात. त्यांना रेणुका नगरमधील राहते घर बदलायचे होते. यासाठी आई आणि बहीण दोन्ही दुसऱ्या गल्लीत भाड्याची खोली पाहण्यासाठी गेले होते. यावेळी ज्योती घरी एकटी होती. आई आणि बहीण घरी आल्यावर ज्योतीला अनेक आवाज देऊन देखील ती दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांना ही बाब सांगितली. या नंतर घराचा दरवाजा तोडला असता तिने साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आहे. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ज्योतीने आत्महत्या का केली, हे स्पष्ठ होऊ शकलेले नाही. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार धर्मा जाधव हे करत आहेत.