औरंगाबाद - भाजपच्या नुपूर शर्मा यांना फाशी द्यायला हवी, अशी मागणी एमआयएम प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील ( MIM State President Imtiaz Jalil ) यांनी केली आहे. पक्षातर्फे त्यांच्यावर फक्त करवाई करणे योग्य नाही, अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे खासदार जलील म्हणाले.
केंद्राने कायदा करावा - कोणत्याही जाती धर्माबाबत आक्षेपाहार्य वक्तव्य करणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी केंद्राने वेगळा कायदा ( Center separate law ) केला पाहिजे. असे वक्तव्य केल्यावर फक्त पक्षातर्फे कारवाई कारवाई केली म्हणजे झाल का?. नुपूर शर्मा यांना इतक सहज सोडून देणे योग्य नाही. या कारवाईवर जगात कोणीही संतुष्ट नाही. कोणत्याही जाती-धर्माबाबत वक्तव्य करणाऱ्यांसाठी नवा कायदा करावा असे जलील यांनी सांगितले.
सोशल मीडियामुळे आंदोलनाला अचानक गर्दी - प्रेषित मुहम्मद पैगंबर ( Prophet Muhammad ) यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी निदर्शने ठेवण्यात आली. काही मुस्लिम संघटनानी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केल होत. कुठलंच नियोजन नसताना इतकी गर्दी कशी झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आयोजकांची चुक असल्यास त्यांच्यावर पण कारवाई करा अशी मागणी जलील यांनी केली.