औरंगाबाद - औरंगजेबने ( Mughal Emperor Aurangzeb ) उभरलेल्या वास्तुंमुळे शहराला वेगळे महत्व मिळाले आहे. दख्खन का ताज अशी ओळख असणाऱ्या बीबी का मकबरा पाहण्यासाठी पर्यटक पसंती देत ( Bibi Ka Maqbara in Aurangabad ) असतात. औरंगेजबाच्या कल्पनेतून हा महाल साकारण्यात आहे. मात्र, इतिहासात औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने आपल्या आईच्या आठवणीत तो बांधल्याचे नमूद आहे.
1668 या काळात बीबी का मकाबरा उभारला - आग्रा येथील ताज महालची हुबेहूब प्रतिमा म्हणजे औरंगाबादच्या बेगमपुरा भागात असलेला बिबीचा मकबरा. मोगल शैलीचे उत्तम उदाहरणं म्हणून याकडे पाहिले जायचे. औरंगजेब यांचा मुलगा आजम शहा याने आपली आई रझिया उल दुराणीच्या आठवणीत हा महाल तयार केल्याच इतिहासात नमूद आहे. मात्र, त्यावेळी तो अवघ्या सात वर्षाचा होता, मग तो इतका मोठा महाल कसा तयार करू शकतो, असे वाद निर्माण झाले. त्यामुळे बिबीचा मकबरा हा औरंगजेबाने बांधला होता, असे मत इतिहासतज्ञ संजय पाईकवार यांनी व्यक्त केले.
मोगल शैलीचे उत्तम उदाहरणं - औरंगजेब दिल्लीला गेला असताना त्याने शहाजहाँने बांधलेला ताजमहाल पाहिला होता. असा एखादा महाल आपणही बांधवा, अशी इच्छा त्याची होती. त्यानुसार त्याने हा मकबरा बांधला, असे मत काही इतिहास तज्ञांचे आहे. ताज महाल पूर्णतः संगमरवरावर दगडात बांधलेला आहे. मात्र, बिबीचा मकबरा बेसॉल्ट दगड, संगमरवर दगड, चुना यांचा वापर करून बांधण्यात आला. यामध्ये कारंजे, बगीचे अशी अनुभव त्यात असून, औरंगजेब कलेचा पुजारी नव्हता. तरी, त्याने उभारलेली ही वस्तू केलेचे उत्तम दर्शन घडवणारी आहे, असे मत इतिहासतज्ञ संजय पाईकवार यांनी व्यक्त केले आहे.