ETV Bharat / city

समर्थ नसते तर शिवाजी नसते - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

author img

By

Published : Feb 27, 2022, 9:50 PM IST

समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजीच नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले.

Bhagat Singh Koshyari on shivaji maharaj
भगतसिंह कोश्यारी प्रतिक्रिया शिवाजी महाराज

औरंगाबाद - समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबादेत झालेल्या जाहीर कार्यक्रमात केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

हेही वाचा - Inquiry of Anil Bonde : प्रक्षोभक भाषेप्रकरणी भाजप आमदार अनिल बोंडेंची चौकशी करा- माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांचे आदेश

समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली. यावेळी आयुष्यात गुरूचे महत्व मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशात गुरूची परंपरा आहे ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो, समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते, समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरूचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे, असे भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. नोट आणि वोटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे, असे राज्यपाल म्हणाले.

मुकाबला बरोबरीत हवा

मोठा असलेला लहानावर हल्ला करतो हे बरोबर नाही, असे म्हणत भागतसिंह कोश्यारी यांनी रशिया आणि युक्रेनवर अप्रत्यक्ष विधान केले. मुकाबला बरोबरीच्या लोकांसोबत व्हावा, त्यावेळी त्यात दुराचार नसावा. रावण शक्तिशाली होता, त्याच्याकडे सत्ता, संपत्ती होती, तो विद्वान होता. देवांचे देव इंद्र देखील त्याच्या पुढे कोणी नव्हते. मात्र, त्याच्या मनात दुराचार आल्याने, रामा सारख्या साधारण व्यक्तीकडून तो पराभूत झाला, असे भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.

हेही वाचा - Aurangabad Students In Ukraine : युक्रेनमध्ये अडकल्या औरंगाबादच्या दोन विद्यार्थिनी.. पालकांची धाकधूक वाढली..

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.