औरंगाबाद - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी माजी खासदार आणि ओबीसी नेते समीर भुजबळ यांनी केली. काही लोक जाणूनबुजून ओबीसी आरक्षणाबाबत चुकीच्या पद्धतीने विधान करत आहे. मात्र अशी विधान आता ओबीसी खपवून घेणार नाही असा इशारा समीर भुजबळ यांनी दिला.
आदर्श महिला शिक्षक पुरस्कार द्यावा -
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे दिल्याने महिलांसाठी शिक्षणाची दार उघडी झाली. त्यामुळे तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवसाला आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली होती. ती मागणी आम्ही लावून धरत आहोत, मुख्यमंत्री नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील असा विश्वास असल्याचं मत समीर भुजबळ यांनी औरंगाबादेत व्यक्त केला.
राज्यात ओबीसी समाज आपल्या मागण्यांसाठी आणि आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करत आहे. मात्र काही ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे आम्ही आता मोर्चे न काढता शांततेने आपली निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यार आहोत. मात्र काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा काढला त्यावेळी कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आंदोलनामध्ये भेदभाव होत असल्याचं दिसून येत असल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी करत मराठा आंदोलनाबाबत अप्रत्यक्ष टीका केली.
मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींना दिलासा -
मराठा आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री आणि नेत्यांनी दिल आहे. मराठा आरक्षण याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यात आता सरकारने चांगले वकील लावून न्यायालयीन लढाई लढली पाहिजे, असं मत समीर भुजबळ यांनी व्यक्त केलं.
औरंगाबादेत झाला ओबीसी आरक्षण बचाओ मेळावा -
ओबीसी बचाओ मेळाव्याचे आयोजन औरंगाबादेत करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी माजी खासदार समीर बुजबळ औरंगाबादेत आले होते. औरंगपुरा भागात झालेल्या मेळाव्यात औरंगाबादसह आसपासच्या शहरातून ओबीसी समाज बांधव दाखल झाले होते. बंजारा नृत्य करत बंजारा समाजाने मेळाव्यात सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले यांच्या वेशभूषेत ओबीसी समाजाच्या मागण्या सरकार दरबारी पोहचवण्याचे काम यावेळी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र तरीही ओबीसी बचाओ समितीने भर रस्त्यात मेळावा घेत जवळपास दोनशे मीटर इतका मोर्चा काढला.