ETV Bharat / city

प्रियकर पोलिसाला अडकवलं अत्याचाराच्या गुन्ह्यात, अन् मग . . .

जिच्यासोबत आयुष्यभर जगण्यामरण्याची स्वप्न पाहिली, तिनंच त्या प्रेमविराला पोलीस कोठडीची हवा खायला लावली. .प्रेयसीच्या या कृत्याने तो मात्र पुरता उद्धवस्त झाला.

author img

By

Published : May 29, 2019, 8:59 PM IST

प्रतिकात्मक छायाचित्र

औरंगाबाद - तो चार्ली पथकातील पोलीस शिपाई. . .. ती महाविद्यालयात शिकणारी अल्लड तरुणी. . . .एकाच परिसरात राहत असल्यानं त्यांच्या मनात प्रेम फुललं. . . . दोघांनी प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या. . . 'साथ जियेंगे साथ मरेंगे' अशा शपथा घेतलेल्या त्या दोन्ही प्रेमविरांनी अनेक दिवस चोरुन चोरुन गाठीभेटी घेतल्या. . . . त्यानंतर मात्र दोघात बिनसलं अन् प्रेयसीनं त्याच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.

जिच्यासोबत आयुष्यभर जगण्यामरण्याची स्वप्न पाहिली, तिनंच त्या प्रेमविराला पोलीस कोठडीची हवा खायला लावली. . . . त्यानंतर तो कोठडीत असताना त्याच्या घरात शिरुन त्याच्या लॅपटॉप, मोबाईल, बँक पासबूक, चेकबूक अन् कागदपत्रावरही तिनं डल्ला मारला. . . .तो कारागृहातून जामीनावर सुटल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानं त्यानही न्यायासाठी धाय मोकलून पोलीस ठाण्याचं दार ठोठावलं. . . .

सिटीचौक पोलीस ठाणे

एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही घटना औरंगाबाद शहरात घडली. त्याचे झाले असे, की आयुक्तालयाच्या चार्ली पथकात बजाजनगरातील अमोल शिवाजी सोनटक्के हा शिपाई म्हणून कार्यरत होता. कर्तव्यावर असताना तो नारळीबागेतील विश्व पॅलेस हॉटेलशेजारी राहत होता. त्याचं शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघंही सुरूवातीला चांगले मित्र-मैत्रिण म्हणून राहायचे. मात्र, कालांतरानं त्यांच्यात वाद झाला. त्यातून तरुणीनं २०१८ मध्ये सिटीचौक पोलीस ठाण्यात अमोल सोनटक्केवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर अमोलला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला कारागृहाची हवा खावी लागली.

या दरम्यान तो कारागृहात असल्याचं पाहून त्याच्या प्रेयसीनं त्याची खोली गाठली. यावेळी त्याचा मित्र नंदकिशोर लोखंडेनं तिला हटकलं. तेव्हा तरुणीनं लोखंडेंना तू आमच्यामध्ये पडू नको, अन्यथा तुझ्यावर देखील गुन्हा दाखल करीन असं धमकावलं. त्यामुळं लोखंडेचा नाईलाज झाला. यावेळी तिनं लॅपटॉप, दहावी-बारावीचा मार्क मेमो, बीएस्सी, मुक्त विद्यापीठाचे मार्कमेमो, रहिवासी, राष्ट्रीयत्व, जातवैधता प्रमाणपत्र, पोलीस दलातील नियुक्ती आदेश, बँकांचं पासबुक, चेकबुक, पोलीस सोसायटीचं पासबुक, दैनंदिन डायरी, मोबाईल, मनगटी घड्याळ, फोटो अल्बम, दुचाकीची कागदपत्रं चोरल्याचं उघड झाल्याचा आरोप नुकताच जामिनावर आल्यानंतर अमोलनं केला. अमोलनं सिटीचौक पोलीस ठाणं गाठत सोमवारी तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक आश्लेषा पाटील करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी दिली.

Intro:एकेकाळी एकमेकांना सोडून न राहण्याच्या आणाभाका घेतलेल्या प्रियकर-प्रेयसीत वाद झाल्यानंतर प्रेयसीने थेट अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे प्रियकर पोलिसाला जेलची हवा खावी लागली. पण प्रियकर जेलमध्ये जाताच प्रेयसीने त्याच्या खोलीतून शैक्षणिक कागदपत्रे, लॅपटॉप, बँकांचे पासबुक, चेकबुक, मोबाईल असे सामान चोरुन नेले. प्रियकराची जामिनावर मुक्तता होताच हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. त्यावरुन त्याने प्रेयसीविरुध्द आता पोलिसात धाव घेतली आहे.
Body:याबाबत पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी सांगितले की, पोलिस आयुक्तालयाच्या चार्ली पथकात असलेले पोलिस शिपाई अमोल शिवाजी सोनटक्के (रा. निलकमल हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर) हे पुर्वी नारळीबागेतील विश्व पॅलेस हॉटेलशेजारी राहत होते. त्यांचे एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. ही तरुणी शहरात शिक्षण घेत आहे. दोघेही सुरूवातीला चांगले मित्र-मैत्रिण म्हणून राहायचे. मात्र, कालांतराने त्यांच्यात वाद झाला. त्यातून तरुणीने २0१८ मध्ये सिटीचौक पोलिस ठाण्यात अमोल सोनटक्के यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर सोनटक्के यांना अटक करण्यात आली. त्यांची अशातच जामिनावर मुक्तता झाली. सोनटक्के हे कारागृहात असल्याचे पाहून तरुणीने त्यांची खोली गाठली. यावेळी त्यांचा मित्र नंदकिशोर लोखंडे यांनी तरुणीला हटकले. तेव्हा तरुणीने लोखंडेंना तू आमच्यामध्ये पडू नको अन्यथा तुझ्यावर देखील गुन्हा दाखल करीन असे धमकावले. त्यामुळे लोखंडे यांचा नाईलाज झाला. यावेळी तरुणीने लॅपटॉप, दहावी-बारावीचा मार्क मेमो, बीएस्सी, मुक्त विद्यापीठाचे मार्कमेमो, रहिवासी, राष्ट्रीयत्व, जातवैधता प्रमाणपत्र, पोलिस दलातील नियुक्तीचे आदेश, बँकांचे पासबुक, चेकबुक, पोलिस सोसायटीचे पासबुक, दैनंदिन डायरी, मोबाईल, मनगटी घड्याळ, फोटो अल्बम, दुचाकीची कागदपत्रे असे सामान चोरले. हा प्रकार निदर्शनास आल्यावर सोनटक्के यांनी सिटीचौक पोलिस ठाणे गाठत सोमवारी तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक आश्लेषा पाटील करत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.