ETV Bharat / city

Aurangabad Crime News : पैश्यांचा पाऊस पाडण्याच्या नावावर ११ लाख ६२ हजारांची फसवणूक; तिघांना अटक - पैश्यांची पाऊस पाडण्याच्या नावावर ११ लाख ६२ हजारांची फसवणूक

पैशांचा पाऊस पाडतो म्हणून पूजेसाठी ११ लाख ६२ हजार रुपये घेऊन फसवणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली ( Raining Money Police Arrested Three Accused In Aurangabad ) आहे.

raining money police arrested three accused in aurangabad

author img

By

Published : Jul 15, 2022, 8:06 PM IST

औरंगाबाद - पैशांचा पाऊस पाडतो म्हणून पूजेसाठी ११ लाख ६२ हजार रुपये घेऊन फसवणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुख्य बसस्थानक जवळील हॉटेलमध्ये पैश्यांची पाऊस पाडण्यासाठी आले असताना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. कैलास साळुंके, प्रमोद कांबळे आणि गोरख पवार, अशी या आरोपींची नावे आहेत. तर, यातील आरोपी रवींद्र हुंडे फरार आहे. जावेद खान नूर खान, पुष्पा बाळगो आणि शोधक निपानकर, अशी फसवणूक झालेल्या तक्रारदारांची नाव ( Raining Money Police Arrested Three Accused In Aurangabad )आहेत.

जावेद खान नुर खान पडेगाव येथे रहिवासी आहेत. त्यांचा आधी ढाबा चालवण्याचा व्यवसाय होता. त्या माध्यमातून अनेकांशी त्यांची ओळख असायची. पुष्पा बाळगो ही त्यांची मानलेली बहीण असून, ती गोव्यात स्थाईक आहे. पुष्पा या जावेद यांच्या घरी आल्या असताना दीपक प्रमोद कांबळे यांनी पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक ओळखीचा असल्याचं सांगितलं. त्यामध्यामातून कैलास साळुंके, प्रमोद कांबळे आणि गोरख पवार यांची ओळख झाली. पूजा करून आपण पैशांची पाऊस पाडू शकतो, असा विश्वास दिला.

त्यासाठी एकदा शिर्डीला नेत आपण पाऊस पाडू शकतो हा विश्वास दिला. पूजा करावी लागलं अस सांगत सात हजार रुपये देखील घेतले. विश्वास बसल्याने जावेद खान यांनी दोन लाख, पुष्पा यांनी ५ लाख ९० हजार तर परिचित असलेले शोधक निपनिकर यांनी २ लाख रुपये दिले. पूजा मांडण्याचं नाटक केलं. मात्र, पाऊस पाडण्यात आला नाही. त्यानंतर आज ( 15 जुलै ) दुपारी मुख्य बस स्थानक जवळ हॉटेल येथे पाऊस पडणार असल्याचं पोलिसांना कळलं. त्यावरून गुन्हे शाखेने धाड टाकून डाव उधळून लावला. जावेद खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहेत, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - Uddhav Thackeray : शिवसैनिकावर हल्ला, उद्धव ठाकरे संतापले; म्हणाले, 'जीवाशी येत असेल तर खपवून...'

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.