ETV Bharat / city

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पेनेतून राज्यात पहिल्यांदाच साकारली 'वृक्ष बँक'

author img

By

Published : Jun 23, 2020, 8:08 PM IST

अन्य बॅंकांप्रमाणेच जिल्ह्यात पहिल्यांदाच वृक्ष बँक साकारण्यात आली आहे. या बँकेत दिलेली वृक्ष वाढवून तुम्हाला परत दिली जातात. तसेच झाडे वाढवण्याबाबत देखील प्रात्यक्षिके पार पडतात. सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून वाळूज सिडको येथे ही वृक्ष बँक सुरू करण्यात आली आहे.

tree bank in aurangaabd
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पेनेतून राज्यात पहिल्यांदाच साकारली 'वृक्ष बँक'

औरंगाबाद - अन्य बॅंकांप्रमाणेच जिल्ह्यात पहिल्यांदाच वृक्ष बँक साकारण्यात आली आहे. या बँकेत दिलेली वृक्ष वाढवून तुम्हाला परत दिली जातात. तसेच झाडे वाढवण्याबाबत देखील प्रात्यक्षिके पार पडतात. सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून वाळूज सिडको येथे ही वृक्ष बँक सुरू करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत या बँकेचे 127 सभासद झाले असून 9 हजार 770 वृक्ष ठेव स्वरुपात या बँकेत संगोपनासाठी ठेवण्यात आल्याची माहिती वृक्ष बँकेचे प्रमुख पोपटराव रसाळ यांनी दिली.

वृक्षरोपण आणि वृक्षसंवर्धन फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून वृक्ष संवर्धन आणि लागवडीचे काम केले जाते. वाळूज आणि आसपासच्या परिसरात हजारो झाडांची लागवड आणि संगोपन करण्यात येत आहे. या फाउंडेशनचे प्रमुख पोपटराव रसाळ यांची वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सोबत भेट झाली. वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याचवेळी वृक्षबँकेची संकल्पना त्यांनी मांडली. त्यावरून पोपटराव रसाळ यांच्या फाउंडेशनच्या सदस्यांनी काम करायला सुरुवात केली. वृक्षबँक तयार करत असताना त्याची नियमावली आणि कार्यशैली ठरवण्यात आली. या वृक्षबँकेत झाड लोकांनी ठेवायचे आणि दीड वर्षांनी ते झाड पुन्हा नेऊन त्याची लागवड आणि संवर्धन त्या ठेवीदाराने करायचे, अशी नियमावली तयार करण्यात आली. वृक्ष देताना एक हमीपत्र लिहून घेण्यात येते. यामध्ये दीड वर्षांनी वृक्षाची लागवड करण्याचे आश्वासन लिखित स्वरुपात घेण्यात येते. एका वृक्षाचे संगोपन करण्यासाठी दीड वर्षांसाठी दहा रुपये इतके शुल्क आकारून बँकेचे सदस्यत्व दिले जाते. या दहा रुपयांमध्ये त्या रोपट्याला लागणारे खत, पाणी, औषधी फवारणी ही कामं केली जातात. रोपटे बँकेत आल्यावर त्यांचा तोच दिवस त्याचा जन्म दिवस म्हणून गृहीत धरला जातो. प्रत्येक महिन्याला एका ठराविक तारखेला रोपट्याचा फोटो काढून वृक्षठेवीदाराला पाठवला जातो. सोळा महिने झाल्यावर वृक्षबँक सदस्याला स्मरण देण्यात येते. दोन महिन्यांनी वृक्षांची लागवड करण्याबाबत तयारी करण्यास सांगितले जाते. त्यानंतर झाडांसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत का, याची पाहणी फाउंडेशनचे सदस्य करणार आहेत. तसेच वृक्ष लागवड केल्यावर प्रत्येक सहा महिन्यांनी पाहणी केली जाणार आहे. अशा पद्धतीने वृक्ष बँकेचे काम चालणार आहे.

वृक्षबँकेची स्थापना सहा महिन्यांपूर्वी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. सहा महिन्यांत 127 जणांनी या अनोख्या बँकेचे सभासद म्हणून नोंदणी केली असून त्या माध्यमातून 9770 रोपटे संगोपनासाठी बँकेत ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील शाळांमध्ये यापुढे वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती वृक्षबँकेचे प्रमुख पोपटराव रसाळ यांनी दिली. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला एक झाड संवर्धनासाठी देण्याची योजना आखण्यात येत असून वृक्ष लागवड पेक्षा वृक्ष संवर्धन करण्याबाबत जनजागृती करणार असल्याचे पोपटराव रसाळ यांनी सांगितले.

नागरिकांचा सहभाग वृक्षबँकेच्या पथ्यावर

झाडांवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. मात्र वृक्षलागवड करणे किंवा संवर्धन करणे याबाबत इच्छा असूनही काम करणे शक्य होत नाही. अशा वृक्षप्रेमींना या बँकेत श्रमदान करण्याची संधी दिली जाते. झाडांना पाणी देणे, खत देणे, योग्य औषधी फवारणी करणे अशी काम वृक्षप्रेमी स्वतः येऊन करतात. अशा वृक्षप्रेमींमुळे वृक्षबँक चांगलं काम करू शकत असल्याचा अनुभव वृक्षरोपण आणि वृक्षसंवर्धन फाउंडेशनचे उपाध्यक्ष कृष्णा गुंड यांनी सांगितलं.

जुन्या झाडांच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी अनोखा प्रयत्न

सिनेअभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी आंब्यांच्या जुन्या प्रजातींचे संगोपन करण्याची संकल्पना मांडली होती. त्याला प्रतिसाद देत वृक्ष बँकेने औरंगाबादच्या हिमायत बाग येथून बिया आणि कोयी आणून आंब्यांच्या जुन्या प्रचातींची रोपटी तयार करण्याचे काम सुरू केल्याची माहिती पोपटराव रसाळ यांनी दिली.

पर्यावरण विभागाने घेतली वृक्षबँकेची नोंद

पर्यावरणाला वाचवण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाची आहे. या परिस्थितीत अनेक लोक वृक्ष लागवड आणि संवर्धनाची काम करतात. त्यातूनच ही वृक्षबँक सुरू झाली आहे. मात्र अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांना सरकारी पाठबळ गरजेचे असल्याचं मत वृक्षप्रेमी अण्णा वैद्य यांनी व्यक्त केलं. तर असे उपक्रम सर्वत्र राबवले जावेत यासाठी पर्यावरण मंत्र्यांना आम्ही आग्रह धरला असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं मत शिवसेना आमदार डॉ.अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.