ETV Bharat / city

रमजान महिन्याचा पहिला जुम्मा सामूहिक नमाज पठणाने साजरा; मशिदीत उसळली गर्दी

शुक्रवार अर्थात जुम्मा मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. यानिमित्त दुपारी शहर व परिसरातील सर्व मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आले.

author img

By

Published : May 11, 2019, 1:07 PM IST

नमाज पठण

औरंगाबाद - रमजान पर्वाचा पहिला शुक्रवार अर्थात जुम्मा मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. यानिमित्त दुपारी शहर व परिसरातील सर्व मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लीम बांधवांची जामा मशिदींमध्ये गर्दी उसळली होती.

नमाज पठण

रमजान इस्लामी कालगणनेतील नववा उर्दू महिना आहे. या महिन्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. मुस्लीम बांधव संपूर्ण महिनाभर अल्लाहची उपासना करण्यावर भर देतात. इस्लामच्या पाच मूळ स्तंभांपैकी एक असलेल्या रोजा अर्थात उपवास याच महिन्यात केले जातो. रोजा म्हणजे केवळ उपाशीपोटी राहणे नसून, मनापासून संपूर्ण शरीरापर्यंत सर्व अवयवांचा उपवास करणे, असे मानले जाते. त्यामुळे वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये, वाईट बघू नये, कोणाला त्रास देऊ नये, वाईट ठिकाणी जाऊ नये, अशा विविध अंगांचा रोजामध्ये समावेश असतो, असे धर्मगुरुंनी जुम्माच्या नमाज पठणापूर्वी दिलेल्या प्रवचनातून सांगितले.

संयम, सदाचार, मानवता, करुणा, आपुलकी, बंधुभाव जोपासण्याचा हा महिना शिकवतो. या महिन्याच्या तिसऱ्या खंडाची प्रतीक्षा न करता सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये गोरगरीब, अनाथ, विधवा, अशा समाजातील विविध घटकांना दानधर्म करावा, असेही आवाहन मशिदींमधून व प्रवचनांद्वारे करण्यात आले आहे.

मंगळवारपासून रमजानला सुरूवात झाल्याने मुस्लीम बांधवांचा उत्साह अधिक वाढला आहे. आज जुम्मा अर्थात शुक्रवार असल्याने आबालवृद्धांनी दुपारी जामा मशिदींमध्ये नमाज पठण करण्यासाठी गर्दी केली होती.

Intro:रमजानपर्वाचा पहिला शुक्रवार अर्थात जुम्मा मुस्लीम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. यानिमित्त दुपारी शहर व परिसरातील सर्व मशिदींमध्ये सामूहिकरीत्या नमाज पठण करण्यात आले. मुस्लीम बांधवांची जामा मशिदींमध्ये गर्दी उसळली होती.

Body:रमजान इस्लामी कालगणनेतील नववा उर्दू महिना आहे. या महिन्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. मुस्लीम बांधव संपूर्ण महिनाभर अल्लाची उपासना करण्यावर भर देतात. इस्लामच्या पाच मूळ स्तंभांपैकी एक असलेल्या रोजा अर्थात उपवास याच महिन्यात केले जातात. रोजा म्हणजे केवळ उपाशीपोटी राहणे नसून, मनापासून संपूर्ण शरीरापर्यंत सर्व अवयवांचा उपवास करणे असे मानले जाते. त्यामुळे वाईट बोलू नये, वाईट ऐकू नये, वाईट बघू नये, कोणाला त्रास देऊ नये, वाईट ठिकाणी जाऊ नये अशा विविध अंगांचा रोजामध्ये समावेश असतो, असे धर्मगुरुंनी जुम्माच्या नमाज पठणापूर्वी दिलेल्या प्रवचनातून सांगितले. संयम, सदाचार, मानवता, करुणा, आपुलकी, बंधुभाव जोपासण्याची हा महिना शिकवण देतो. या महिन्याच्या तिसऱ्या खंडाची प्रतीक्षा न करता सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये गोरगरीब, अनाथ, विधवा अशा समाजातील विविध घटकांना दानधर्म करावा, असेही आवाहन मशिदींमधून वा प्रवचनाद्वारे करण्यात आले. मंगळवारपासून रमजानला सुरु वात झाल्याने मुस्लीम बांधवांचा उत्साह अधिक वाढला आहे. आज जुमा अर्थात शुक्रवार असल्याने आबालवृद्धांनी दुपारी जामा मशिदींमध्ये नमाज पठण करण्यासाठी गर्दी केली होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.