औरंगाबाद शहराजवळील पिसादेवी परिसरात शेतीच्या वादातून दिवसाढवळ्या कुऱ्हाड डोक्यात घालून शेतकर्याची हत्या farmer killed by ax due to agricultural dispute करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 2008 पासून जमिनीचा वाद असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जनार्धन कासार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. farmer killing in Aurangabad
एट्रोसिटी दाखल करण्याची मागणी गुरुवारी एक वाजेच्या सुमारास जनार्धन कासार आपल्या शेतीमध्ये कामाला गेले असता त्यांच्यावर शिवाजी औताडे, बाळू औताडे, गिरीजा औताडे, भारत औताडे आणि महादू औताडे या आरोपींसह सात ते आठ जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. डोक्यात वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरोपींवर एट्रोसिटी दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथके रवाना मृतांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तक्रार दाखल करण्यात अली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे तीन पथक तयार करण्यात आले आहे. आरोपींना शोधण्यासाठी पथक वेगवेगळ्या भागात रवाना झाले आहे. अशी माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांनी दिली.
हेही वाचा Urfi Javed Rape Threat उर्फी जावेदला बलात्काराची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या