ETV Bharat / city

Online fraud : ऑनलाईन थाळी बुक करणे पडले महाग, 89 हजारांची झाली फसवणूक - 89 हजारांची झाली फसवणूक

औरंगाबादमधील 'एकावर एक थाळी मोफत' (Buy one get one free) या जाहिरातीला बळी पडून एका ग्राहकांने ऑनलाइन बुकिंग केली. त्यातून त्याला 89 हजारांची फसवणूक (Online fraud) झाल्याचे समोर आले आहे.

Online fraud
Online fraud
author img

By

Published : Dec 2, 2021, 7:52 PM IST

औरंगाबाद - जाहिरात आणि फसवणूकीचे नवं नवे प्रकारसमोर येत आहेत. एका ठगाने चक्क फेसबुकवर प्रसिद्ध हॉटेलमध्ये थाळीची जाहिरात करून ग्राहकाला 89 हजाराला गंडवल्याचे समोर आले आहे. 'एकावर एक थाळी मोफत' या जाहिरातीला बळी पडून एका ग्राहकांने ऑनलाइन बुकिंग केली. त्यातून ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

ऑनलाईन थाळी बुक करणे पडले महाग
अशी झाली फसवणूक
फेसबुकवर गेल्या काही महिन्यांपासून शहरातील भोज हॉटेलबाबत एक जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. त्यात एक थाळी आरक्षित केल्यावर दोन थाळी मोफत दिल्या जातील असे सांगण्यात येत. शहरातील व्यावसायिक असलेले बाबासाहेब ठोंबरे यांच्या मुलाने थाळी आरक्षित करण्यासाठी प्रक्रिया केली. त्यावेळी ऑनलाइन पैसे मागण्यात आले. फोनवर ऑर्डर क्रमांक आल्याचे सांगण्यात आले. तो क्रमांक दिल्यावर प्रक्रिया पूर्ण होण्यास अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा एकदा फोनवर आलेला क्रमांक म्हणजेच OTP मागण्यात आला. तो देताच थाळी मिळेल अस सांगण्यात आलं. मात्र दोन दिवसांनी खात्यातून 89 हजार काढल्याच समोर आलं. ठोंबरे यांनी लगेच पोलिसात धाव घेत तक्रार दिली.
हॉटेलची जाहिरात अधिकृत नाही
या बाबत सिडको येथील भोज हॉटेल मध्ये चौकशी केली असता, सदरील जाहिरात अधिकृत नसल्याची माहिती हॉटेल मालक अंकित अग्रवाल यांनी दिली. हॉटेलच्या नावाने याआधीही फसवणूक झाली होती. त्यावेळी हॉटेलतर्फे अधिकृत तक्रार करण्यात आली आहे. त्यावेळेस पोलिसांनी कारवाई देखील केली. मात्र नवीन जाहिरात, नवीन नंबर देऊन पुन्हा एकदा ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्याबाबत अधिकृत माहिती हॉटेल कडून देण्यात आली आहे. इतकच नाही तर सोशल मीडियावर आणि हॉटेलच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती टाकण्यात आली आहे. कोणीही अशा जाहिरातींना फसू नये. अशा जाहिराती जर समोर आल्या तर हॉटेलच्या मोबाईल क्रमांकावर खात्री करून घ्यावी, असे आवाहन हॉटेल कडून करण्यात आले आहे.
Online fraud
भोज हॉटेल
नागरिकांनी सतर्क रहावे
फसवणूक झाल्या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा जाहिरातींना फसू नये, ऑनलाइन व्यवहार करत असताना कोणालाही आपला ओटीपी शेअर करू नये. अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.