औरंगाबाद - शहरात गुरुवारी दुपारच्या सुमारास पद्माकर मुळे आणि जुगलकिशोर तापडिया या दोन व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शहरात सात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेस ही छापेमारी झाली आहे. मात्र याबाबत ईडी तर्फे अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
साखर कारखाना खरेदी प्रकरणी चौकशी...?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बांधकाम व्यावसायिक जुगलकिशोर तापडिया यांनी काही वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील साखर कारखाना लिलावात विकत घेतला होता. हाच कारखाना त्यांनी 2016- 17 च्या सुमारास शहरातील उद्योजक पद्माकर मुळे यांना विक्री केला होता. या व्यवहारात नेमका पैशाची देवाण-घेवाण कशा पद्धतीने झाली. याबाबत ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. या व्यवहारात जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर देखील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही कारवाई नेमकी साखरकारखान्यांच्या खरेदीबाबत आहे की वक्फ बोर्डचा जमीन प्रकरणी? याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे पद्माकर मुळे हे पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांचे सासरे असल्याने, त्याप्रमाणे देखील या प्रकरणाकडे पाहिल्या जात आहे. मात्र याबाबत ईडीने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिली नसल्याने याप्रकरणी आणि शहरात सुरू असलेल्या कारवाई बाबत अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत.
हेही वाचा - एसटीचा पर्यटकांना फटका, जादा पैसे देऊन करावा लागतोय बैलगाडीने प्रवास
पुण्यातही ईडीचे छापे -
पुण्यात वक्फ बोर्डच्या मालमत्तेसह 7 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. दरम्यान, याच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - औरंगाबाद : पर्यटनस्थळांसह कार्यालयीन भेटीसाठीही लसीकरण आवश्यक