जालना : सौंदर्य प्रसाधने म्हणटलं की महीलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. मात्र, ब्रँडेड सौंदर्य प्रसाधने वापरत असतांना, ते खरोखरच कंपणीचे आहेत की बनावट आहे? याची खात्री महिलांना आली पाहिजे. कारण, जालना येथे सदर बाजार पोलिसांनी (Jalna Sadar Bazar Police) काही दुकानांवर छापे मारले असता, हिंदुस्थान युनीलिव्हर लिमिटेडचे कंपणीचे बनावट सौंदर्य (Duplicate Cosmetics Seized In Jalna) प्रसाधने जप्त केले. तर लँकमे या ब्रँडचे 2 लाख 75 हजार रुपयांचे बनावट कॉस्मेटिक सापडले आहे.
जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी सौंदर्य प्रसाधने विक्री करणाऱ्या दुकानांवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत हिंदुस्थान युनीलीव्हर लिमिटेड कंपनीच्या नावाने, बनावट सौंदर्य प्रसाधने विक्री करणाऱ्या दुकानातून लाखो रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केलाआहे. नेत्रीका कन्सल्टींग प्रायव्हेट लिमिटेडच्या, एका अधिकाऱ्याने या संदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शहरातील कडबीमंडी भागात हिंदुस्थान युनीलीव्हर कंपनीचे बनावट सौंदर्य प्रसाधने विक्री होत असल्याची ही तक्रार होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी कडबीमंडी भागांत जाऊन 3 दुकानांवर छापेमारी केली. या छापेमारीत लँकमे या ब्रँडचे 2 लाख 75 हजार रुपयांचे बनावट कॉस्मेटिक आढळून आले असून, या प्रकरणी पोलिसांनी दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहे. या बनावट सौंदर्य प्रसाधनावर कोणताही बॅच नंबर, बारकोड आढळून आलेला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर बाजार पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात दररोजची लाखो रुपयांची उलाढाल असते. अश्यातच एवढा मोठा बनावट माल सापडल्याने, ईमानदारीने व्यवसाय करणाऱ्या दुरानदारांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
हेही वाचा : Seized Drug In Nalasopara - नालासोपारा अवैध धंद्याचं केंद्र? पोलिसांसमोर मोठे आव्हान