औरंगाबाद - श्रावणी सोमवार म्हणलं की वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भक्तांची दर्शनासाठी मोठी रेलचेल पाहायला मिळते. मात्र कोरोनामुळे धार्मिक स्थळ बंद असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा हिरमोड झाला. तरीही मंदिरातही पुजाऱ्यांनी आणि विश्वस्तांनी विधिवत पुजा करत पहिला श्रावणी सोमवार साजरा केला.
कृष्ण देवराई केले मंदिराचे निर्माण
मंदिराचे निर्माण दहाव्या शतकात राष्ट्रकुट वंशातील राजा कृष्ण देवराय यांनी केले होते. हे मंदिर लाल रंगाची माती आणि दगड वापरून केलेले असून एकोणीसाव्या शतकात इंदोरची राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोधार केला. जो पर्यंत वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेत नाही, तो पर्यंत अकरा ज्योतिर्लिंगाचे घेतलेले दर्शन सफल होत नाही, असे मानले जाते.
कोविडमुळे दोन वर्षांपासून अनेक निर्बंध
मार्च 2020 पासून कोविडमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे घृष्णेश्वरला येणाऱ्या भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. महाशिवरात्री आणि श्रावणात येणाऱ्या भक्तांना दर्शन न घेताच माघारी जावं लागतं आहे. या काळात मंदिर पुजाऱ्यांनी आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत मुख्यपुजा आणि आरती संपन्न करण्यात आली.
हेही वाचा - धक्कादायक: परदेशी तस्कराने पोटात लपवून आणले 1 कोटीचे ड्रग, एनसीबीकडून जप्त