औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वादग्रस्त जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्या निलंबनाचा आदेश विद्यापीठ प्रशासनाने काढला असल्याची माहिती प्रशासनाचे कुलसचिव गणेश मंझा यांनी दिली आहे. शिंदे यांना निलंबित करण्याची ही दुसरी वेळ आहे.
संजय शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एका विद्यार्थिनीशी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मेसेज केले होते. दरम्यान पीडित विद्यार्थिनीने या प्रकरणी विशाखा समितीकडे तक्रार केली होती. मात्र, विशाखा समितीने विद्यार्थिनीला उलट सवाल केले होते. यावेळी पीडितेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. या तक्रारीवरून संजय शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठाचा निलंबनाचा आदेश -
दरम्यान संजय शिंदे यांनी विद्यार्थिनी असे वर्तन केल्याप्रकरणी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. शिंदेचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी संघटनांनी केली होती. यासाठी विद्यार्थिनींनी मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन दिले होते. याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने संजय शिंदे यांना निलंबित केल्याचा आदेश काढला आहे.
हेही वाचा - विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग; विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल