औरंगाबाद - देशात सर्वाधिक लस महाराष्ट्राला देण्यात आल्या आहेत. लोकसंख्येप्रमाणे लस पुरवठा होत आहे. केंद्र सरकारकडून डिसेंबरपर्यंत दोनशे कोटी लसींची निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पीएम फंडमधून आलेले बहुतांश व्हेंटिलेटर चांगले आहेत. यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. कोविडमुळे व्हेंटिलेटरची गरज अचानक वाढली आहे. याआधी भारतात व्हेंटिलेटर तयार केले जात नव्हते. मात्र, आता भारतात व्हेंटिलेटर तयार करण्यात येत आहेत. औरंगाबादला पहिल्या टप्प्यात मिळालेले सर्व यंत्र चांगले आहेत. दुसऱ्यांदा आलेले यंत्रात बिघाड आहे. त्याबाबत यंत्रज्ञ दुरुस्तीचे काम करत आहेत. मात्र जर यात कोणाची चूक असेल तर कारवाई करावी, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
हेही वाचा-विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांच्या राजीनाम्यावर औवेसी यांची केंद्रावर टीका
विभागीय आयुक्तांसोबत झाली बैठक
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मराठवाड्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट अजून 22 आहे. ही अद्याप चिंतेची बाब आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आणखी उपाययोजना करणे गरजचे असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. बुरशीजन्य आजार किंवा ब्लॅक फंग्स हा आजार नवीन आहे. त्यामुळे त्याबाबत औषधी अद्याप जास्त प्रमाणात नसल्याने अडचण होत आहे. या आजाराबाबत आपणच काळजी घेण्याची गरज असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
दरम्यान, केंद्र सरकारने पीएम केअर्स फंडद्वारे राज्यांना व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले होते. परंतु या पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. कित्येक रुग्णालयांमध्ये हे व्हेंटिलेटर्स धूळ खात पडलेले दिसून आले.
हेही वाचा-'पीएम केअर व्हेंटिलेटर आणि मोदींमध्ये अनेक समानता, दोघेही कूचकामी'