औरंंगाबाद - भारतीय चलनातून बाद झालेल्या १००० आणि ५०० रुपये किमतीच्या जवळपास एक कोटी रुपयांच्या नोटा गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई बुधवारी मोंढा नाका चौकातील सिंधी कॉलनी येथे असलेल्या हॉटेल ग्लोबल इन येथे करण्यात आली. चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून देण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांसह चार जणांना अटक केली. प्रियंका सुभाष छाजेड (वय ३०, रा.कामगार कॉलनी, चिकलठाणा), नम्रता योगेश उघडे (वय ४०, रा.जबिंदा इस्टेट, बीड बायपास), मुश्ताक पठाण जमशिद पठाण (वय ५३, रा.टाईम्स कॉलनी, कटकटगेट), हाशीम खान बशीर खान (वय ४४, रा.लक्ष्मण चावडी) अशी त्यांची नावे आहेत.
यावेळी पोलिसांनी चौघांच्या ताब्यातून भारतीय चलनातून बाद करण्यात आलेल्या १ हजार आणि ५०० रूपये किमतीच्या जवळपास ९८ लाख ९२ हजार ५०० रूपये किमतीच्या नोटा आणि चार मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.