ETV Bharat / city

डिप्रेशनमध्ये गेलेल्या तरुणीचे दामिनी पथकाने केले समुपदेशन - औरंगाबाद दामिनी पथक

मित्राचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने डिप्रेशनमुळे रात्री २ वाजेपर्यंत दवाखान्यासमोर २४ वर्षीय तरुणी बसून राहत होती. या तरुणीचे दामिनी पथकाने समुपदेशन केले आहे.

दामिनी पथकाने केले समुपदेशन
दामिनी पथकाने केले समुपदेशन
author img

By

Published : Jun 24, 2021, 1:14 PM IST

Updated : Jun 25, 2021, 9:11 AM IST

औरंगाबाद - महाविद्यालयीन मित्राचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे 24 वर्षीय तरुणी डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यामुळे रात्री दोन वाजेपर्यंत ती दवाखान्यासमोर बसून राहायची. यामुळे मुलीची आई, मुलगी घरात नसल्याने सतत चिंतेत राहायची. मुलीच्या आईने दामिनी पथकाकडे तक्रार दिल्यानंतर दामिनी पथकाने त्या मुलीला विश्वासात घेत तिचे समुपदेशन केले. यामुळे डिप्रेशन मध्ये गेलेल्या मुलीला काहीसा आधार मिळाला, असल्याची माहिती दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे यांनी दिली.

मुलीच्या आईची दामिनी पथकाकडे तक्रार

निर्मला निंभोरे म्हणाल्या की, पोलीस आयुक्त कार्यालयास आलेल्या तक्रारीनुसार शहरातील नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या महिलेने दामिनी पथकाची भेट घेतली होती. त्यावेळी 'माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, माझ्या पतीचे पाच महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. माझी मुलगी राखी (नाव बदललेले आहे) ही जवळपास तीन महिन्यांपासून रात्रीचे दोन ते तीन वाजेपर्यंत घरी येत नाही. त्यामुळे आम्ही खूप चिंतेत आहोत. मुलगी नीट उत्तरही देत नाही, कुठे जाते हे सांगत नाही', अशी तक्रार मुलीच्या आईने दामिनी पथकाकडे दिली.

रोज रात्री बसायची सिग्मा हॉस्पिटल समोर

दामिनी पथकाने संबंधीत मुलीला विश्वासात घेत विचारले असता तिने सांगितले की, 'एस.बी कॉलनीमध्ये राहणाऱ्या माझ्या मित्राचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले. माझे कुठेच मन लागत नसून, माझी मनस्थिती बरोबर नसल्याने मी काही दिवसांपासून रात्री सिग्मा हॉस्पिटल येथे जाऊन बसत आहे'. त्यामुळे दामिनी पथकातर्फे तरुणीचे समुपदेशन करण्यात आले. या समुपदेशनामुळे मुलीला काहीसा आधार मिळाला असून, मुलीच्या आईने पोलिसांचे आभार मानले आहे. असे निर्मला निंभोरे यांनी सांगितले.

हेही वाचा - पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा!!! पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा

Last Updated : Jun 25, 2021, 9:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.