ETV Bharat / city

Inquiry of Anil Bonde : प्रक्षोभक भाषेप्रकरणी भाजप आमदार अनिल बोंडेंची चौकशी करा- माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांचे आदेश - अॅड रविप्रकाश जाधव

अमरावती येथे १८ जानेवारीला आंदोलनात माजी मंत्री अनिल बोंडे यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अत्यंत प्रक्षोभक भाषा ( Objectionable language against Nana Patole ) वापरली. अनिल बोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकावणे, अवमानकरक टिपण्णी करणे, कटकारस्थान रचणे, समाजात तेढ निर्माण करणे, दोन गटात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप महारष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाचे अध्यक्ष अॅड. रविप्रकाश जाधव ( Adv Raviprakash Jadhav ) यांनी केला.

अनिल बोंडे
अनिल बोंडे
author img

By

Published : Feb 26, 2022, 5:22 PM IST

अमरावती - माझगाव महानगर दंडाधिकारी यांनी कॉंग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल माजी मंत्री अनिल बोंडे ( Ex Minister Anil Bonde ) , भाजप आमदार कृष्णा खोपडे ( BJP MLA Krushna Khopade ) , भाजप युवा मोर्चा जालनाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांची ( BJP Jalna Yuva Morcha Sujit Jogas ) चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी चौकशी करुन २३ मार्चपर्यंत अहवाल सादर करावे, असे आदेश दिले आहेत.

अमरावती येथे १८ जानेवारीला आंदोलनात माजी मंत्री अनिल बोंडे यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अत्यंत प्रक्षोभक भाषा ( Objectionable language against Nana Patole ) वापरली. अनिल बोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धमकावणे, अवमानकरक टिपण्णी करणे, कटकारस्थान रचणे, समाजात तेढ निर्माण करणे, दोन गटात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप महारष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाचे अध्यक्ष अॅड. रविप्रकाश जाधव ( Adv Raviprakash Jadhav ) यांनी केला.

हेही वाचा-Russia Ukraine Crisis : 'युद्ध सुरुयं, मला शस्त्र द्या, पळ काढण्यासाठी विमान नाही'; युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेची ऑफर फेटाळली

२३ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

मानहानी करणे, सामाजिक शांतता भंग करणे तसेच कोरोना साथ व प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी माझगाव न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची महानगर दंडाधिकारी यांनी दखल घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस स्टेशन यांनी माजी मंत्री अनिल बोंडे, नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे व भाजप युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष सुजित जोगस यांची चौकशी केली. त्यांना २३ मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा- Maratha Reservation : राज्य सरकारने शब्द पाळला नाही म्हणून, आमरण उपोषणाचा निर्णय : छत्रपती संभाजीराजे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.