औरंगाबाद - अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली कोरोनावर उपचार ( Covid Treatment ) म्हणून मान्यता मिळलेली गोळी उपलब्ध ( Molnupiravir Tablet Available In Aurangabad ) झाल्याची माहिती सिग्मा रुग्णालयाचे डॉ उन्मेष टाकळकर यांनी दिली. मोलनुपिरावीर ( Molnupiravir 800 mg ) अस या गोळीच नाव असून, या गोळीला परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या सर्वच व्हेरिएंटवर ही गोळी प्रभावी असल्याच तज्ञांचं म्हणणं आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळेल गोळी
कोरोनाची ही गोळी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेता येणार आहे. कोणत्या परिस्थितीत रुग्णाला ही गोळी द्यायची आहे, याबाबत तपासणी करून डॉक्टर निर्णय घेतील. अतिबाधित म्हणजे हाय रिस्कमध्ये असणाऱ्या रूग्णांना ( High Risk Covid Patients ) पहिल्या दिवसापासून पाचव्या दिवसांपर्यंत ही गोळी घ्यावी लागणार आहे. 800 मिलीग्रामचा डोस एकावेळी घ्यावा लागणार असून, त्याची किंमत साधारणतः तीन- साडेतीन हजार असेल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
गर्भवती महिलांनी टाळावी गोळी
कोरोनाची लक्षण आहेत म्हणून ही गोळी जाऊन विकत घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही गोळी घ्यावी असं सिग्मा रुग्णालयाचे डॉक्टर उमेश टाकळकर यांनी सांगितलं. तसेच लहान मुलं, गर्भवती महिला यांना सध्यातरी ही गोळी देता येणार नाही, असंही डॉ. टाकळकर यांनी सांगितलं.