ETV Bharat / city

राज्याला सध्यातरी तिसऱ्या लाटेचा धोका नाही, मात्र आम्ही तयार - राजेश टोपे

राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका सध्या नाही. मात्र, राज्य त्यासाठी तयार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

rajesh tope
आरोग्य मंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Jul 2, 2021, 4:46 PM IST

Updated : Jul 2, 2021, 4:57 PM IST

औरंगाबाद - राज्यात डेल्टा पल्सचे आतापर्यंत 21 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर 20 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका सध्या नाही. मात्र, राज्य त्यासाठी तयार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे हे रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेत आले होते.

प्रतिक्रिया देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे
  • केंद्राने लसींचा पुरवठा केल्यास कोरोनाला हरवणे शक्य -

गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. केंद्राने लसींचा साठा पाठवला नसल्याने काही ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागत आहे. औरंगाबादसारख्या ठिकाणी रोज पन्नास हजार लस देणे शक्य आहे. केंद्राने रोज लागणारा साठा पाठवल्यास, लवकरात लवकर लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे शक्य आहे. लसीकरण हे एकमेव साधन आहे ज्याने आपण कोरोनाला हरवू शकतो. असे देखील राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

  • वर्षभरात 1 हजार नवीन रुग्णवाहिका -

औरंगाबाद जिल्हा परिषदेला एकूण 48 रुग्णवाहिका द्यायच्या आहेत ती सुरुवात आता करण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून बऱ्याच रुग्णवाहिका खराब अवस्थेत होत्या. त्या बदलण्याची गरज होती. त्या आता बदलण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात पुढील वर्षभरात एक हजार नवीन रुग्णवाहिका बदलण्यात येणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी औरंगाबादच्या जिल्हा परिषदेत दिली. काही ठिकाणी रुग्णवाहिका चालकांचे वेतन झालेले नाही, हे सत्य आहे. मात्र कंत्राटावर असलेल्या लोकांना हा त्रास होतो म्हणून याबाबत आम्ही अर्थखात्यासोबत चर्चा देखील सुरू केली आहे, असे देखील टोपे यांनी सांगितलं. एखाद्या जिल्ह्यात रुग्ण वाढले, तिसरी लाट आली असे म्हणता येणार नाही. आपण दररोज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. टेस्टिंग वाढूनही रुग्ण कमी आढळून येत आहेत. आता rtpcr टेस्ट मधूनच आपण पॉझिटिव्ह विकी रिपोर्ट काढत आहोत. हा आकडा कमी राहिला तर त्याचा आढावा घेऊन नक्कीच लावलेले निर्बंध कमी करण्यात येतील, असे देखील टोपे यांनी सांगितलं.

  • लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी -

गेल्या काही दिवसांमध्ये काही ठिकाणी खासगी रुग्णालयांनी रुग्णांची अडवणूक केल्याचे पाहायला मिळालं आहे. उपचाराचे पैसे कमी दिल्याने मृतदेह आढळल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी तिथे ऑडिटर ठेवावा, त्या ऑडिटरच्या स्वाक्षरीने त्या पूर्ण रिपोर्टची तपासणी केली पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्याकडे लक्ष दिले पाहिजे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला जुमानत नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या रुग्णालयावर तातडीने कारवाई केली पाहिजे, असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा - जरंडेश्वर साखर कारखान्यावरील ईडीच्या कारवाईनंतर अजित पवारांनी अखेर मौन सोडले, म्हणाले..

हेही वाचा - 'आपला अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे जाणं चुकीचे' - खासदार विनायक राऊत

Last Updated : Jul 2, 2021, 4:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.