ETV Bharat / city

Corona Aurangabad : कोरोनामुळे मृतांपेक्षा मदत अर्ज तीनपट; अर्जांची शहानिशा करुन दिली जाणार मदत - औरंगाबाद महानगरपालिका अर्जांची छाननी करणार

महानगरपालिका हद्दीत 1 हजार 980 नागरिकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याचे निर्देश देताच मृतांच्या वारसांनी अर्ज दाखल केले. त्यात मात्र मोठी तफावत असल्याच दिसून आले. पालिकेकडे मदत मिळवण्यासाठी जवळपास 5 हजार 346 अर्ज प्राप्त झाल्याने खरे अर्ज किती? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोविड केअर सेंटर
कोविड केअर सेंटर
author img

By

Published : Jan 11, 2022, 7:05 PM IST

Updated : Jan 11, 2022, 7:18 PM IST

औरंगाबाद - कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीला पन्नास हजारांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाने दिल्यानंतर एक नवा पेच निर्माण झाला आहे. मृतांपेक्षा मदत मागणाऱ्यांची संख्या तीन पट अधिक असल्याने औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने समोर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता आलेल्या अर्जांची छाननी करून शहानिशा करण्याचे काम करावा लागत आहे.

माहिती देतांना आरोग्य अधिकारी
  • मृतांपेक्षा तीन पट अधिक अर्ज

मागील दीड वर्षांपासून कोरोनाचे थैमान अनुभवायला मिळत आहे. त्यात दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या अधिक होती. अक्षरशः अंत्यविधीसाठी स्मशान भूमीत जागा शिल्लक नसल्याने मिळेल त्या जागी अंत्यविधी कारावे लागत होते. महानगरपालिका हद्दीत 1 हजार 980 नागरिकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याचे निर्देश देताच मृतांच्या वारसांनी अर्ज दाखल केले. त्यात मात्र मोठी तफावत असल्याच दिसून आले. पालिकेकडे मदत मिळवण्यासाठी जवळपास 5 हजार 346 अर्ज प्राप्त झाल्याने खरे अर्ज किती? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • अर्जाची शहानिशा सुरू

औरंगाबाद शहरात मृत झालेल्या नागरिकांची संख्या आणि मिळालेले अर्ज यात मोठी तफावत आढळून आली आहे. सध्या अर्जबाबत शहानिशा करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. शहरात अनेक मोठे रुग्णालय आहेत, जिथे अद्यावत आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्हा बाहेरुन देखील अनेक नागरिक उपचारासाठी दाखल झाले होते. त्यात काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा नागरिकांची यादी करून त्या-त्या जिल्ह्यातील प्रशासनाला पाठविण्यात आली आहे. इतकेच नाही तर आलेल्या अर्जात काही नोंदी दोनदा आल्या आहेत. असा काही तांत्रिक अडचणी तपासणी करण्यात येत असून योग्य वारसांनाच आर्थिक मदत दिली जाईल, असा विश्वास मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Corona Update : भारतात कोरोना रुग्णांमधे घट, 1.68 लाख नवीन रुग्णांची नोंद

Last Updated : Jan 11, 2022, 7:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.