ETV Bharat / city

औरंगाबादेत इंधन दरवाढीविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन

author img

By

Published : Jun 30, 2021, 5:49 PM IST

इंधन दरवाढीविरोधात पैठणगेट येथे दि. 30 जून रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे महागाई वाढत चालली असून त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने दिलासा देण्याची गरज असल्याचे मत कम्युनिस्ट नेते ॲड. अभय टाकसाळ यांनी व्यक्त केले.

आंदोलन
आंदोलन

औरंगाबाद - इंधन दरवाढीविरोधात पैठणगेट येथे दि. 30 जून रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे महागाई वाढत चालली असून त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने दिलासा देण्याची गरज असल्याचे मत कम्युनिस्ट नेते ॲड. अभय टाकसाळ यांनी व्यक्त केले.

औरंगाबादेत इंधन दरवाढीविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन

वाढत्या महागाईचा निषेध
गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनतेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेल, शेतीविषयक सर्वसाधने, खाद्यतेल आदींच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्य जनता आणि कष्टकरी यांचे कंबरडे मोडले आहे. या धोरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार हिरावून घेण्यात आला आहे. त्यांना बेरोजगार करण्यात आले आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढत गेल्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या महागाईबाबत केंद्र सरकारने तातडीने पावले उचलत सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आली.

आंदोलनात केलेल्या मागण्या -
1) पेट्रोल-डिझेलच्या किमती तात्काळ कमी करा.
2) खते बी-बियाणे अवजारे आणि शेती विषयक औषधे यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ रद्द करा.
3) सर्व जीवनावश्यक वस्तू खाद्यतेल आणि धान्याच्या वाढलेल्या प्रचंड किमती रद्द करा.
4) कराचा भरणा करीत नसलेल्या सर्व कष्टकरी कुटुंबांना दरमहा साडे सात हजार रुपये आर्थिक मदत द्या.
5) प्रधानमंत्री यांनी जाहीर केलेल्या ग्रामकल्याण अन्य योजना तोकडी असल्यामुळे प्रत्येक कुटुंबास दहा किलो धान्य, डाळी, खाद्यतेल, मसाले, चहा इत्यादींचा पुरवठा करा.
6) शेतकऱ्यांना पीक विम्याच्या संदर्भातील नुकसानभरपाई त्वरित करा.
7) शेतकऱ्यांना सुलभ रीतीने पीक कर्ज उपलब्ध करा.
8) मनरेगाची कामे हाती घेऊन रोहयो मजुरांचे थकीत वेतन तातडीने अदा करा.
9) कोरोनाकाळात काम केलेल्या असंघटित क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्या.
या आणि यांच्यासह अन्य मागण्यांसाठी आज पैठणगेट येथे निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात कॉ. प्राध्यापक राम बाहेती, कॉ. अशफाक सलामी, कॉ. अभय टाकसाळ, कॉ. भास्कर लहाने, कॉ. मधुकर खिल्लारे यांच्यासह इतर आंदोलकांनी सहभाग नोंदवला.

हेही वाचा - विधानसभा अध्यक्ष येत्या अधिवेशनात निवडला जाणार, तर अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार - बाळासाहेब थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.