ETV Bharat / city

Cm Uddhav Thackeray : फडवणीस म्हणतात गधाधारी, आम्ही 'गधा' सोडलायं; उद्धव ठाकरेंचा टोला

माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला ( uddhav thackeray on aurangabad Water scheme ) आहे.

uddhav thackeray
uddhav thackeray
author img

By

Published : Jun 8, 2022, 8:38 PM IST

Updated : Jun 9, 2022, 6:40 AM IST

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची औरंगाबदमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेत पाणीप्रश्नावरुन शिवसेनेवर टीका करणाऱ्यांचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे. मी असा मूर्ख राजकारणी आहे, जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला ( uddhav thackeray on aurangabad Water scheme ) आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे.

मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. . मी असा मूर्ख राजकारणी आहे, जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणार आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

'तुम्ही पाच वर्षे मुख्यमंत्री होता का...' - संभाजीनगर कधी करणार प्रश्न विचारतात. माझ्या वडिलांनी शिवसेना प्रमुखांनी शब्द दिलाय. तो लक्षात आहे. मंत्रिमंडळाने ठराव पास करून दिलाय, सध्या विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव पण दिलाय. संभाजी महाराजांच्या नावाला शोभेल, असं शहर करेल. आरोप करणाऱ्यांनी आधी केंद्रातून विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून आणावा, आम्ही सत्कार करू. मध्ये कोणीतरी आक्रोश मोर्चा काढला, तो पाण्याचा नाही, तर सत्ता गेल्याचा आक्रोश होता. तुम्ही पाच वर्षे मुख्यमंत्री होता का प्रश्न सोडवला नाही?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

'मोहन भागवंतांनी केलेलं वक्तव्य योग्य' - भाजपाच्या एका खासदाराने मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणार वक्तव्य केलं. शिवसेना प्रमुखांनी कधीही कोणत्या जातीचा व्देष करायला शिकवलं नाही, त्यांची ती शिकवण नव्हतीच. मोहन भागवंतांनी केलेले वक्तव्य योग्य आहे. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही. इतिहास पुसता येत नाही. पंतप्रधान बरोबर म्हणतात की विरोधक मूळ मुद्द्याला बगल देतात, ते बरोबर आहे. पण, महाराष्ट्रात विरोधक भाजपा आहे, हे त्यांना लक्षात येत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.

'...मुख्यमंत्री झाला हे पटत नाही' - आम्ही गड किल्ल्याचं संवर्धन करतोय, संतपीठ सुरु केलं. महाराष्ट्रात विकास करतोय, पुढे जातोय, मात्र यांना बघवलं नाही. यांना रोज स्वप्न पडतात की सकाळी मी मुख्यमंत्री होईल. कोणताही अनुभव नसणारा मुख्यमंत्री झाला हे पटत नाही. अडीच वर्षे झाली. ज्यांच्यासोबत 25 वर्ष खडतर काळातसोबत होते. शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला साथ दिली. तुमच्या नेत्यांना संकटातून बाहेर काढलं. आज ही शिवसेना तुम्हाला टोचू लागली, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला हाणला आहे.

गोपीनाथ मुंडे शिवसेना प्रमुखांकडे आले होते. भाजपाला महापौर पद मागितलं. त्यांनी कुठलीही आकडेमोड न करता देऊन टाकल होतं. हृदयात राम आणि हाताला काम, असं आमच हिंदुत्व आहे. फडणवीस म्हणतात गधा धारी. आम्ही गधा सोडलाय, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : "मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून..."; संजय राऊतांचा मनसेवर निशाणा

Last Updated : Jun 9, 2022, 6:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.