औरंगाबाद आमच्या पिढीला बरबाद करण्यास कारणीभूत असणाऱ्या शिक्षकांना पाठीशी घालणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द Constituency of Teachers and Graduates करा, अशी मागणी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी BJP MLA Prashant Bamb has Demanded केली आहे. भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत जिल्हा परिषद शिक्षकांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात Cancel Constituency of Teachers and Graduates आली होती. मात्र, आता अशा शिक्षकांना पदवीधर आणि शिक्षक आमदार पाठीशी घालतात. चुकीच्या लोकांना पाठीशी घातल्यामुळे या शिक्षकांना पाठबळ मिळतं म्हणूनच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करायला हवेत असं मत आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केले.
आमदार प्रशांत बंब यांनी केली होती मागणी आमदार प्रशांत बंब MLA Prashant Bamb यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालय रहावे असा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात आमदार प्रशांत बंब यांना फोनवरून जाब विचारून अर्वाच्य भाषेत धमकी दिल्याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकांनी प्रशांत बंब यांना विचारला जाब बंब यांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा विधानसभेत मांडला होता. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय, अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यालयी वास्तव्य असणे आवश्यक आहे. असा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी व शिक्षक मुख्यालय न राहता घरभाडी उचलून शासनाची फसवणूक करतात असेही ते म्हणाले होते. त्यावरून अनेक शिक्षकांनी आमदार प्रशांत बंब यांना फोन करून याविषयी जाब विचारला आहे.
शिक्षकाच्या पत्नीची आमदार बंब यांना फोनवरून धमकी अनेक ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल आमदार प्रशांत बंब यांना फोनद्वारे बोललेल्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका शिक्षकाच्या पत्नीने आमदार बंब यांना फोन करून धमकी देऊन अर्वाच्य भाषा वापरून बदनामी केली असल्याचा आरोप बंब समर्थकांनी केला आहे. त्यामुळे लासूरच्या सरपंच मीना पांडव यांच्या तक्रारीवरून गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख हे करत आहेत.